
IRCTC Job Scam : नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचा कथित घोटाळा प्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलगी मीसा भारती हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
राबडी देवी यांच्या निवासस्थानी आज सीबीआयने छापा टाकला. त्यानंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर आता लालू प्रसाद यादव यांनाही सीबीआयने समन्स बजावले असल्याची माहिती समोर आली आहे.
आज (6 मार्च 2023) जेव्हा सीबीआयची टीम राबडी देवींच्या निवासस्थानी पोहोचली. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही तेथे होते. बिहारमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर तेजस्वी यादव हे देखील काही काळाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजर झाले.
नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचा कथित घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत. याबाबत दिल्लीत उद्या सीबीआय त्यांची चौकशी करणार आहे. तसेच त्यांच्यासह इतर 14 जणांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
आज सीबीआयच्या पथकाने लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांची चौकशी केली. त्यानंतर आता लालू प्रसाद यादव यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत.
नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा हे प्रकरण लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असतानाचे आहे. सीबीआय आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.