महाराष्ट्रा पाठोपाठ राजस्थानवर ‘दिल्लीश्वरांची‘ नजर !

Rajsthan Politics|महाराष्ट्रात सत्ताबदल केल्यावर भाजप नेतृत्वाने आता त्याच पध्दतीने राजस्थानातही सत्ताबदलाची शक्यता चाचपण्यास सुरवात केली आहे.
Rajsthan Politics| gajendra singh shekhawat|
Rajsthan Politics| gajendra singh shekhawat|

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ताबदल केल्यावर भाजप नेतृत्वाने आता त्याच पध्दतीने राजस्थानातही सत्ताबदलाची शक्यता चाचपण्यास सुरवात केली आहे. राजस्थानात सचिन पायलट यांना भाजपकडे (BJP) वळविण्याचा यापूर्वीचा प्रयोग फसला तरी पक्षनेतृत्वाने आशा सोडलेली नाही. तेथे कॉंग्रेसला (Congress) सत्तेबाहेर घालवून नियोजित सत्तापरिवर्तनाच्या ‘खेला होबे‘ मध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी वठविलेल्या भूमिकेत दिसून ते त्याच मार्गाने जाऊ शकतात.

दरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तूर्त समजूत काढण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू केले आहेत. एका भाजप नेत्याच्या मते, ‘फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कसा सीन झाला, हे आपण नीट पाहिले असेलच', हा मेसेज वसुंधरा यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचविण्यात आला आहे. वसुंधरा राजे यांच्या कारभाराबद्दल जनतेत अजूनही रोष आहे. मात्र त्यांची उपद्रवक्षमताही मोठी असल्याने ‘दिल्ली‘ने वसुंधरा यांच्याबाबत सावध पावले टाकण्याचे धोरण जारी ठेवले आहे. एरव्ही भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत शक्यतो केंद्रीय मंत्रीच पत्रकारांना संबोधित करतात. मात्र हैदराबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आजच्या पहिल्या दिवशीची पहिलीच पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी भाजप नेतृत्वाने वसुंधरा यांच्यावर टाकून त्यांना चुचकारण्याचा आणखी एक प्रयत्न केला.

Rajsthan Politics| gajendra singh shekhawat|
शरद पवारांनी आरोप फेटाळला ; म्हणाले, 'याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही'

राजस्थानात पुढील वर्षी (२०२३) विधानसभा निवडणुका आहेत मात्र भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाला तेवढे थांबण्याचीही गरज वाटत नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच्या दौऱयात, आम्हाला अशोक गेहलोत सरकार पाडण्यात रस नाही असे सांगितले त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहूनगेले आहे. मुख्य म्हणजे उदयपूर येथील २८ जूनच्या हत्याकांडाच्या घटनेने भाजपच्या आशा पल्लवित केल्या आहेत. कन्हैय्यालाल या तरूणाचा दोन तरूणांनी शिरच्छेद ककेल्याच्या घटनेचे राजस्थानातील जनमानसात तीव्र पडसाद उमटले आहेत. संघपरिवाराच्या दृष्टीने ही घटना भाजपला पुन्हा सत्तेपर्यंत नेण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आजच ‘राजस्थान प्रवास' करणे, हा यातील योगायोग मानला जातो.

महाराष्ट्रात २१ जून रोजी शिवसेनेत दुफळी झाली तेव्हापासून राजस्थान भाजपा प्रदेश अध्यक्ष सतीश पूनिया, शेखावत आदी नेत्यांची वक्तव्ये पाहिल्यास, राजस्थान तर महाराष्टारापेक्षा सोपे जाईल', असा विश्वास भाजपला देणारे संकेत मिळत आहेत. याही वेळेस भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे ‘लक्ष्य' सचिन पायलट हेच आहेत. त्यांच्या गटाकडून आता पुन्हा असंतोष व नाराजी दर्शक विधाने समोर येत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. सध्याचे गेहलोत सरकार ‘जुगाड' पध्दतीने कसेबसे तगले आहे व ते आपोआप लवकरच सत्तेबाहेर जाईल, आम्हाला काही करण्याची गरजच उरणार नाही, असे भाजप नेते सातत्याने व छातीठोकपणे सांगत आहेत

मात्र नुकत्याच राज्यसभा निवडणुकीत भाजप समर्थक उमेदवाराला हरवताना गेहलोत यांनी जे डावपेच खेळले. त्यामुळे कॉंग्रेस आमदारांच्या फोडाफोडीच्या कथित खेळात पक्षनेतृत्व सावधपणे पावले टाकत आहे. राजस्थानात कॉंग्रेसमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून आल्याने राज्य मुदतपूर्व निवडणुकांच्या दिशेने जात असल्याचे माजी प्रदेशाध्यक्ष अरूण चतुर्वेदी यांनी सांगितले. राजस्थान सरकारच्या गाडीचे टायर कधी पंक्चर होईल व सरकार गडगडेल याचा भरोसा नसल्याचे विधान पुनिया यांनी अनेकदा केले आहे. मध्य प्रदेश असो, महाराष्ट्र की राजस्थान, कॉंग्रेस व त्यांच्या मित्रांना स्वतःचे घरही सांभाळता येत नाही व सरकार पडले की भाजपवर बिनबुडाचे आरोप लावले जातात असा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com