Tamil Nadu : महाराष्ट्रानंतर तामिळनाडूतही राज्यपाल विरुद्ध सरकार वाद; CM स्टॅलिन यांनी उचलले मोठे पाऊल

Tamil Nadu : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि राज्यपाल यांच्यातील वाद विकोपाला
MK Stalin
MK Stalin Sarkarnama

Tamil Nadu : महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अनेकदा महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मात्र, राज्यपालांवर कारवाई झाली नसल्याने नाराजीचा सूर आहे.

अशातच आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि राज्यपाल आर.एन.रवी यांच्यामधील वाद विकोपाला गेल्याचं आज पाहायला मिळालं. राज्यपाल आर.एन.रवी (RN Ravi) यांनी काही भाग वगळून अभिभाषणाचे वाचन केल्याने सत्ताधारी द्रमुक पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

सत्ताधारी पक्षाने राज्यपालांना दिलेल्या भाषणातील काही भाग न वाचल्यामुळे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सभागृहात त्यांच्या विरोधात ठराव मांडत तो मंजूर करून घेतला. त्यामुळे राज्यपाल सभागृह सोडत बाहेर पडले.

मात्र, या वरून राज्यपाल आर.एन.रवी आणि सत्ताधारी द्रमुक यांच्यामधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातील काही भाग वगळणे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सभागृहात ठराव मंजूर करून घेणे असा प्रकार पहिल्यादांच घडला आहे.

MK Stalin
Nagpur : झाडे, खोब्रागडे, अडबालेंचे नामांकन दाखल, आघाडी उद्या करणार घोषणा !

नेमकं काय घडलं?

तमिळनाडूमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झालं. यावेळी राज्यपाल आर.एन.रवी यांनी आपल्या लिखित भाषणातला काही भाग टाळला. त्यामध्ये 'द्रविड मॉडेल'चा समावेश होता. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचा उल्लेख टळला. त्यामुळे राज्यपालांच्या भाषणानंतर सत्ताधारी द्रमुकच्या आमदारांनी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यपालांनी भाषणाची सुरुवात ही तमिळ भाषेत केली. यावेळी त्यांनी 'पोंगल' कापणीच्या सणाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदारांनी 'अंगलनाडू तामिळनाडू' (आमची भूमी तामिळनाडू) अशा घोषणा दिल्या. मात्र काही वेळानंतर आमदारांची घोषणाबाजी थांबली. त्यानंतर राज्यपाल सभागृहातून बाहेर गेले.

MK Stalin
BJP : उर्फीसाठी वेळ पण, माझ्यावरील अन्याय पक्षात ऐकलं जात नाही : अंधारे-चाकणकरांसमोर महिलेने मांडली व्यथा!

याबाबत स्टॅलिन म्हणाले, ''राज्यपाल आमच्या तत्त्वांच्या विरोधात जरी वागत असले तरी आम्ही विधानसभेची परंपरा पाळली. तसेच भाषण संपेपर्यंत आमचा निषेध दर्शविला नाही. मात्र राज्यपालांनी सरकारच्या तत्त्वांच्या विरोधात हे कृत्य केले. तसेच राज्यपाल यांच्या भाषणातील जो भाग भाषणाच्या प्रतीचा नव्हता. तोही न काढण्याचा प्रस्ताव मांडला'', असं मुक्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटलं. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com