
Pradeep Kurulkar News Update: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) चे माजी संचालक प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून 5मे ला अटक केली. कुरुलकर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना कोठडी १५ मे पर्यंत वाढवली. यावेळी गुप्तचर विभागाचा अन्य एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे आता एटीएस'च्या जाळ्यात अडकलेला तो दुसरा अधिकारी कोण असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. (After Kurulkar, who is 'that' officer of the intelligence department caught in the ATS net)
संबंधित अधिकारी देखील अशाच प्रकारे हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय ATSला आहे. पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या ऑपरेटिव्हने महिलेच्या वेशात कुरुलकर यांना भुरळ घातली होती. तोच भारतीय दुसऱ्या एका गुप्तचर अधिकाऱ्याच्याही संपर्कात असल्याचं तपासात समोर आलं आहे. या अधिकाऱ्याची देखील चौकशी सुरु आहे. संबंधित अधिकाऱ्याचाही आयफोन आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तसेच अधिकाऱ्याने पाकिस्तानी गुप्तचर महिलेसोबत कोणती गोपनीय माहिती शेअर केली आहे, याची चौकशी सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Pradeep Kurulkar Latest news)
दरम्यान, कुरुलकर यांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या गोष्टीला जवळपास आठवडा लोटला. कुरुलकर हे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा ATS कडून करण्यात आला. त्यांची चौकशीही करण्यात आली. पण अद्याप कुरुलकर प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांनी शत्रू राष्ट्राला कोणती माहिती पुरवली आहे. त्यात माहितीत काय काय सांगितलं, ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्र एटीएस'ने अद्याप याबाबत मिडीयासमोर कोणताही खुलासा केलेला नाही. यामुळे या प्रकरणाची उत्सुकता आता वाढू लागली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर - ऑक्टोंबर दरम्यान व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल द्वारे होते पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या ऑपरेटिव्हशी संपर्कात होता. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या तांत्रिक उपकरणांच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय आहे. तसेच, परदेशवारी दरम्यान परदेशात पाकिस्तानी ऑपरेटिव्हशी भेट झाली की नाही याचाही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाची कुणकुण भारताच्या गुप्तहेर यंत्रणांना या आधीच लागली होती. त्यामुळे कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांची या आधीच बदली देखील करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांना अटक करण्यात आली.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.