दर दहा दिवसांनी काँग्रेसचे आमदार फोडणार! हार्दिक पटेलांची रणनीती

भाजपमध्ये प्रवेश करताच आखली काँग्रेसला खिंडार पाडण्याची योजना
Hardik Patel
Hardik Patel Sarkarnama

अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी 15 दिवसांपूर्वी काँग्रेसला (Congress) रामराम केला होता. त्यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. असे असतानाच आता हार्दिक पटेल यांनी दर दहा दिवसांची पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले आहे. यात काँग्रेस आमदारांसह नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Hardik Patel Latest News)

हार्दिक पटेल यांचा गांधीनगरमध्ये झालेल्या मोठ्या कार्यक्रमात पक्षप्रवेश झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि सरकारमधील मंत्री उपस्थित होते. या वेळी बोलताना हार्दिक पटेलांनी पुढील रणनीती स्पष्ट केली. ते म्हणाले की, काँग्रेसचे आमदार आणि नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करता यावा, यासाठी दर दहा दिवसांनी मी कार्यक्रम घेणार आहे. या कार्यक्रमातून काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेशाचे आवाहन करण्यात येईल. काँग्रेस पक्ष सध्या कोणतेही काम करण्याच्या मानसिकतेत नाही. इतर पक्षांतील नेत्यांनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन मी करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगाचा अभिमान आहेत.

हार्दिक यांनी 19 मे रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर 15 दिवसांतच ते भाजपध्ये दाखल झाले आहेत. आज भाजपमध्ये दाखल होण्याआधी हार्दिक पटेलांनी ट्विट करत आगामी भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, देशहित, राज्यहित, जनहित आणि समाजहिताची भावना डोळ्यासमोर ठेवून मी आज एका नवा अध्यायाची सुरवात करीत आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी सुरू असलेल्या भगिरथ कार्यात मी एका छोटा सैनिक बनून काम करेन.

Hardik Patel
सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर आप सरकार बॅकफूटवर; गाजावाजा करीत घेतलेला मोठा निर्णय अखेर मागे

हार्दिक पटेल हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांच्या गुप्त बैठका दोन महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा होती. यामुळे काँग्रेसला रामराम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी ते भाजप किंवा आपमध्ये उडी मारतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांचा पक्षप्रवेश झाला असून, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Hardik Patel
अल्पसंख्याक शब्दाला आता भाजपचा आक्षेप; केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह म्हणाले...

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे ट्विट करीत जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com