Foxconn Project : गुजरातनंतर फॉक्सकॉनचे प्रकल्प तेलंगण, कर्नाटकात; महाराष्ट्र 'वेटिंग'वरच

Telangan and Karnataka : प्रकल्पातून होणार दोन लाख रोजगार निर्मिती
K Chandrashekhar Rao
K Chandrashekhar RaoSarkarnama

Maharashtra News : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळात येणारा वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून राज्यात दीड लाख रोजगार निर्मिती झाली असती. त्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली होती.

दरम्यान त्याच ताकतीचा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यासही आता सहा महिने उलटले आहेत. मात्र त्या दृष्टीने कोणतीही हालचाल सुरू असल्याचे दिसून येत नसल्याचे विरोधक सांगत आहेत.

महाराष्ट्र (Maharashtra) फॉक्सकॉनसारख्या मोठ्या प्रकल्पाची वाट पाहत आहे. मात्र फॉक्सकॉन (Foxconn) कंपनी तेलंगण आणि कर्नाटक या दोन राज्यात गुंतवणूक करणार आहे. त्यातून दोन्ही राज्यात प्रत्येकी एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

K Chandrashekhar Rao
Bacchu Kadu Vs Shivsena 'गद्दारी'वरून बच्चू कडू आक्रमक : ‘हमारी खुद की पानटपरी है! कहाँ लगाना है, हम देखेंगे...’

वेदांत फॉक्सकानचा प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेल्यानंतर महाराष्ट्रात चांगलाच गदारोळ झाला होता. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. आता त्यानंतरचे दोन प्रकल्पही राज्याच्या शेजारील राज्यात गेले आहेत. फॉक्सकॉनने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्सरींग प्रकल्प तेलंगणमध्ये (Telangana) गेला आहे. याबाबत फॉक्सकॉनने तेलंगण सरकारशी करार केला आहे. त्यातून एक लाख रोजगार निर्माण होतील, अशी माहिती ट्वीटद्वारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी गुरुवारी दिली आहे.

तेलंगणसह कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी फॉक्सकॉनचा आयफोन निर्मिती करण्याचा प्रकल्प कर्नाटकमध्ये सुरू होणार असल्याचे ट्वीट केले आहे. कर्नाटकमधील ३०० एकर क्षेत्रावरील या प्रकल्पासाठी ७० कोटी डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून एक लाख रोजगार निर्मिती होईल, असा दावाही बोम्मई यांनी केला आहे.

K Chandrashekhar Rao
Chhatrapati Sambhajinagar News : नामांतराच्या समर्थनात मनसेची स्वाक्षरी मोहिम..

फॉक्सकॉनचे (Foxconne) इलेक्ट्रॉनिक मॅनिफॅक्चरिंग प्रकल्प तेलंगणा आणि आयफोन निर्मितीचा प्रकल्प कर्नाटकमध्ये गेला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात येणार फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला वळविला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या शेजारील तीन राज्यात फॉक्सकॉनने गुंतवणूक केली आहे. त्यातून संबंधित राज्यात प्रत्येकी एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रालाही वेदांता फॉक्सकॉनच्या तकतीचा प्रकल्प देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. ते मात्र अद्यापही पूर्ण झाले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in