बंगाल पेटला! वीरभूमनंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ल्याचे सत्र

वीरभूममधील हिंसाचारानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ले सुरू झाले आहेत.
Birbhum Violence
Birbhum Violence Sarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) वीरभूम (Birbhum) जिल्ह्यात 8 जणांना जिवंत जाळल्याच्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. राज्यात आज दोन ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. नादिया जिल्ह्यात एका तृणमूल काँग्रेसच्या महिला नेत्याच्या पतीवर गोळीबार करण्यात आला तर हुगळी जिल्ह्यात दुचाकीवरून जाणाऱ्या तृणमूलच्या नगरसेविकाला अज्ञात वाहनाने उडवले. या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

वीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे 22 मार्चला घरांना आगी लावल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तृणमूलचे नेते बहादूर शेख यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ही घरे पेटवून देण्यात आली. या घटनेचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटले आहेत. आता राज्यात याचे हिंसक पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. मागील 24 तासांत दोन वेगवेगळ्या घटनेत तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत.

Birbhum Violence
ममतांचा दणका! तृणमूलच्या नेत्यालाच अटक करण्याचे पोलिसांना आदेश

हुगळी जिल्ह्यात तारकेश्‍वर भागात नगरसेविका रुपा सरकार यांना मोटारीने जोरात धडक दिली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना काल रात्री घडली होती. त्या दुचाकीवरून घरी जात असताना एका मोटारीने त्यांना धडक दिली होती. दुसऱ्या घटनेत नादिया जिल्हयात एका तृणमूल नेत्यावर गोळीबार झाला आहे. सहदेव मंडल असे त्यांचे नाव असून, त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. बगुला ग्रामपंचायत सदस्या अनिमा मंडल यांचे ते पती आहेत.

Birbhum Violence
'टॅक्स फ्री' न करताही 'काश्मीर फाईल्स' सगळ्यांना फुकट दाखवण्याचा केजरीवालांनी सुचवला फंडा

शवविच्छेदनाचा अहवाल धक्कादायक

रामपूरहाट येथे आठ जणांना जिवंत जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन करणाऱ्या आणि न्यायवैद्यक पथकाचा अहवाल आज सादर करण्यात आला आहे. यातील शवविच्छेदन अहवाल आणखीच धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. पीडितांना आधी बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांना जाळण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com