भाजपने निलंबन केल्यानंतर नुपूर शर्मांचा माफीनामा; म्हणाल्या, मी रागाच्या भरात ते बोलले!

प्रेषित महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल कथितरीत्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपने हात झटकले आहेत.
Nupur Sharma Latest Marathi News
Nupur Sharma Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपने (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे. त्यानंतर शर्मा यांनी आपल्या वक्तव्यावरून माफी मागितली आहे. रागाच्या भरात ते वक्तव्य केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. (Nupur Sharma Latest Marathi News)

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर शर्मा यांनी ट्विट करत खुलासा केला आहे. आपल्या वक्तव्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या असतील तर ते वक्तव्य मी मागे घेते, असं त्यांनी म्हटलं आहे.

Nupur Sharma Latest Marathi News
भाजपने निलंबित केलेल्या नुपूर शर्मांमुळे भिडले होते दोन गट; 29 जणांना अटक

काय म्हटलं आहे नुपूर शर्मा यांनी?

मी मागील अनेक दिवसांपासून टीव्हीवरील चर्चेत सहभागी होत होते. तिथे दररोज माझे आराध्य भगवान महादेव यांचा अपमान होत होता. माझ्या समोर हे म्हटलं जात होतं की, ते शिवलिंग नसून कारंजे आहे, दिल्लीत्या पदपथांवर अनेक शिवलिंग दिसतात, जाऊन पुजा करा. माझ्यासमोर सतत महादेवांचा अपमान होत असल्याने मी सहन करू शकले नाही आणि रागाच्या भरात काही गोष्टी बोलले. जर माझ्या शब्दांमुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर शब्द मागे घेते. कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं नुपूर शर्मा यांनी म्हटलं आहे.

Nupur Sharma Latest Marathi News
चूक करणाऱ्याला निलंबित करा! अजितदादांनी मनिषा म्हैसकरांसह अधिकाऱ्यांना स्टेजवरच झापलं!

दरम्यान, भाजपने नुपूर शर्मा यांच्याप्रमाणेच नवीन कुमार जिंदाल यांनाही निलंबित केले आहे. त्यांनी ट्विटवर वादग्रस्त पोस्ट केली होती. दोन्ही नेत्यांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या. शर्मा आणि जिंदाल यांच्यामुळे या वादात भर पडली होती. याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गंभीरपणे दखल घेतल्याचे समजते. त्यामुळे पक्षाने दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी पक्षाकडून निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंह यांनी याबाबतचे निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

Nupur Sharma Latest Marathi News
तानाजी सावंत यांच्या वाहनाचा पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात

भारताच्या हजार वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म वाढला आहे. भाजपकडून सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. कोणताही धर्म किंवा धार्मिक व्यक्तींचा अपमान निंदनीय आहे. कोणत्याही धर्माचा अपमान करणाऱ्या विचारधारेविरोधात पक्ष आहे. भाजपकडून अशा कोणत्याही विचारधारेचा प्रचार केला जात नाही, असं निवेदनात स्पष्ट करून नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्या वक्तव्यांपासून हात झटकले आहेत.

भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीच्या धर्माचा अभ्यास करण्याचा अधिकार देते. संपूर्ण देश स्वातंत्र्याची 75 व्या वर्षाचा जल्लोष करत असताना आम्ही भारताला एक महान देश बनविण्यासाठी कटिबध्द आहोत. जिथे सर्वजण समान असती, प्रत्येकाचा सन्मान होईल, जिथे सर्व जण भारताची एकता आणि अखंडतेसाठी कटिबध्द असतील, जिथे सर्वांना विकासाचा फायदा होईल, असंही पक्षाकडून निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com