केजरीवालांच्या एका ट्विटने मोदी सरकारसह सिंगापूरच्या सरकारची उडाली धावपळ

देशातील कोरोनाची दुसरी लाट आली असून, आताच तिसऱ्या लाटेवरुन राजकारण सुरू झाले आहे.
after arvind kejariwal tweet singapore and indian government clarify
after arvind kejariwal tweet singapore and indian government clarify

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची (Covid19) दुसरी लाट आली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी सिंगापूरमधील कोरोना विषाणूच्या प्रकाराबाबत (Singapore Corona Variant) ट्विट केले होते. या एका ट्विटमुळे सकाळपासून मोदी सरकारसह सिंगापूरच्या सरकारची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र आहे. दोन्ही देशांची परराष्ट्र मंत्रालये खुलाशावर खुलासे करीत आहेत. 

केजरीवाल यांनी ट्विट करताच त्याला सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने उत्तर दिले. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने उत्तर दिले. दोन्ही बाजूंकडून आज सकाळपासून या प्रकरणी खुलासे करण्याचे सत्र सुरू होते. भारत सरकारने तर केजरीवाल हे संपूर्ण भारताच्या वतीने बोलू शकत नाहीत, अशी भूमिका घेतली. 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर म्हणाले की, कोरोना विरोधातील लढाईत सिंगापूर आणि भारत हे दीर्घकालीन साथीदार आहेत. भारताला ऑक्सिजनसह इतर उपकरणांचा पुरवठा करण्यात सिंगापूरची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यांनी आपल्यासाठी त्यांची सैन्य विमाने तैनात केली होती. ही दीर्घकालीन भागीदारी बिघडू शकते हे माहिती असताना बेजबाबदारपणे विधाने करण्यात आली. मी तुम्हाला सांगू इच्छितो की दिल्लीचे मुख्यमंत्री संपूर्ण भारतासाठी बोलत नाहीत.  

केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटले होते की, सिंगापूरहून येणारी सर्व विमाने केंद्र सरकारने ताबडतोब बंद करावीत. सिंगापूरमध्ये सापडणारा कोरोनाचा विषाणूचा प्रकार दिल्लीत येऊ शकते. तो दिल्लीत आल्यास कोरोना संसर्गाची तिसरी लाट येईल. सिंगापूरमधील हा विषाणूचा प्रकार लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक आहे. याचबरोबर केंद्र सरकारने लहान मुलांसाठी लस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे. 

यावर सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सिंगापूरमध्ये आढळत असलेला कोरोना विषाणूचा बी.1.617.2 हा प्रकार भारतातच पहिल्यांदा आढळला होता, अशी आठवण करुन दिली. याबाबत सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सिंगापूरमध्ये अनेक कोरोना रुग्णांमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा प्रकार पहिल्यांदा भारतातच सापडला होता. त्यामुळे सिंगापूर प्रकार हा अस्तित्वात नाही. त्यामुळे केजरीवाल यांनी केलेल्या दाव्यात तथ्य नाही. एक मोठा राजकीय नेता अशा प्रकारचे विधान करण्याआधी तथ्य तपासून पाहत नाही, हे दुर्दैवी आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com