Hindenburg's New Report: अदानींनंतर आणखी एका उद्योजकाची हिंडेनबर्गकडून पोलखोल; संपत्तीत १० अब्ज डॉलरची घट

हिंडनबर्ग संशोधन अहवालानंतर इकान एंटरप्राइजेज एल.पी चे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत घसरले.
Hindenburg's new report:
Hindenburg's new report: Sarkarnama

After Adani Hindenburg's New Report: जानेवारीमध्ये अदानी समूहाविरोधात प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळे एकच खळबळ उडाली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरुन केंद्रातील भाजप सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. हिंडेनबर्ग संशोधनाचा हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर नंतर अदानी समुहाचे शेअरर्स चांगलेच घसरले होते. त्यामुळे त्यांच्या संपत्तीही घटली. अदानी समुहानंतर आता हिंडेनबर्गने (Hindenburg) आणखी एका कंपनीची पोलखोल केली आहे. (After Adani, another entrepreneur is poached by Hindenburg; A $10 billion drop in wealth)

अदानी यांच्यानंतर शॉर्ट सेलर फर्मने आता ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांच्या कंपनी ब्लॉक (ब्लॉक इंक) वर निशाणा साधला आहे.हिंडेनबर्ग कंपनीने कॉर्पोरेट कार्यकर्ता कार्ल इकान यांची गुंतवणूक कंपनी इकान एंटरप्राइजेज एल.पी विरुद्ध एक अहवाल जारी केला आहे. यात Ponzi (गुंतवणूक योजना) सारखी आर्थिक रचना स्वीकारल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. अहवाल समोर आल्यानंतर, कार्ल इकानच्या संपत्तीत मंगळवारी एका दिवसात 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली. (Hindenburg on Adani Group)

Hindenburg's new report:
Hindenburg-Adani Case: हिंडेनबर्ग -अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सेबी आणि अर्थमंत्रालयाला महत्त्वाचे आदेश

हिंडनबर्ग संशोधन अहवालानंतर इकान एंटरप्राइजेज एल.पी चे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत घसरले. ही सार्वजनिकपणे व्यापार करणारी मर्यादित भागीदारी कंपनी कार्ल इकानची होल्डिंग कंपनी म्हणून काम करते. शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे इकानच्या संपत्तीत 3.1 बिलियन डॉलरची घट झाली आहे.

शॉर्ट सेलर फर्मने इकान एंटरप्रायझेसमधील कार्ल इकानच्या स्टेकबद्दल देखील तपशीलवार माहिती दिली आहे. यापूर्वी ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सद्वारे निव्वळ संपत्ती निर्धारित करताना त्यांच्या मार्जिनची गणना केली जात नव्हती. आता त्याचाही समावेश निर्देशांकात सुरू झाला आहे. अशाप्रकारे, कार्ल इकाहनच्या निव्वळ संपत्तीत 7.3 अब्ज डॉलरचे अतिरिक्त नुकसान झाले. अशा प्रकारे, त्यांची संपत्ती एका दिवसात 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमी झाली आहे.

हा अहवाल येण्यापूर्वी कार्ल इकान हे ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात जगातील 58 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांची एकूण संपत्ती $25 अब्ज होती. मात्र, अहवाल आल्यानंतर त्यांची संपत्ती 41 टक्क्यांनी घटली आणि ती 14.6 अब्ज डॉलरवर आली. यानंतर, कार्ल इकान देखील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप-100 मधून बाहेर पडले.आता ते या यादीत 119व्या स्थानावर आहे. (Hindenburg news on Adani Group)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in