कोश्यारींनी दिल्ली दौरा केला अन् तिसऱ्याच दिवशी शिष्य दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाला...

Governor bhagat singh koshyari | Pushkar Singh Dhami |BJP : निव्वळ योगायोग...
Governor bhagat singh koshyari | Pushkar Singh Dhami
Governor bhagat singh koshyari | Pushkar Singh Dhami Twitter

डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly Election) ७० पैकी ४७ जागा जिंकून भाजपने बहूमत मिळवलं, पण मुख्यमंत्र्यांचाच पराभव झाल्याने भाजपवर मोठी नामुष्की ओढावली. गड आला पण सिंह गेला अशी पक्षाची अवस्था झाली. पण अखेर पराभव होऊनही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचे शिष्य आणि काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे.

आपल्या शिष्य दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असल्यामुळे गुरु आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही आनंद झाला आहे. कोश्यारी यांनी ट्विट करुन धामी यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, उत्तराखंडचे काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर धामी यांची विधीमंडळ नेते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

११ मार्च रोजी ५ राज्यांचे निकाल जाहिर झाले होते. मात्र १० दिवसनंतर बहुमत असूनही भाजपने उत्तराखंडमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाजपच्या गोटामध्ये संभ्रम होता. पराभूत मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह आमदार सतपाल महाराज, आमदार धनसिंह रावत, राज्यसभेचे खासदार अनिल बलूनी यांचे नाव आघाडीवर होते. मात्र माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक, माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, केंद्रीय मंत्री अजय भट्ट हे सर्वजण धामींच्यामागे उभे राहिल्यामुळे त्यांच्याच पारड्यात वजन पडले. याशिवाय योगायोग म्हणजे धामींचे नाव जाहिर होण्याच्या तीन दिवसांपूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांनी दिल्ली दौरा केला होता.

Governor bhagat singh koshyari | Pushkar Singh Dhami
निवडणुकानंतर जनतेला शॉक! पेट्रोल, डिझेल महागलं अन् एलपीजी 50 रुपयांनी वाढला

यापूर्वी खटीमा (उधमसिंह नगर) मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले पुष्कर सिंह धामी राज्याचे १२ वे मुख्यमंत्री ठरले होते. धामी यांचा जन्म पिथौरागढमधल्या टुण्डीमध्ये झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना राजकारणाची ओढ होती. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर काम केले. पुढे ते भारतीय जनता युवा मोर्चाचे दोनदा अध्यक्षही झाले होते. उत्तराखंडची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांचे सल्लागार म्हणून काम पाहिले. तेव्हा पासून भगतसिंह कोश्यारींचे निकटवर्तीय आणि शिष्य म्हणून त्यांना ओळखलं जातं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com