भारतात पाऊल ठेवताच खासदारांना रडू कोसळलं अन् म्हणाले, आता सगळं संपलं!

रविवारी अफगाणिस्तानातून168 नागरिकांना हवाईदलाच्या विमानाने मायदेशी आणले.
भारतात पाऊल ठेवताच खासदारांना रडू कोसळलं अन् म्हणाले, आता सगळं संपलं!
Afghanistans MP breaks down as he reaches India

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर तेथून बाहेर पडण्यासाठी भारतासह अनेक देशांतील नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी अफगाणिस्तानातून 168 नागरिकांना हवाई दलाच्या विमानाने मायदेशी आणले. यामध्ये 24 शीख नागरिक असून त्यापैकी दोघे जण अफखाण खासदार आहेत. खासदार नरेंद्र सिंह खालसा यांनी भारतात पाऊल ठेवलं अन् त्यांना रडू कोसळलं. भारतात आल्याबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी अफगाणिस्तानच्या स्थितीबाबत दु:खही व्यक्त केलं आहे. (Afghanistans MP breaks down as he reaches India)

गाजियाबादमधील हिंडन विमानतळावर हवाई दलाचे विमान रविवारी उतरले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार खालसा यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, मला आता रडावसं वाटत आहे. मागील 20 वर्षांत आम्ही जे काही बनवलं होतं, ते आता सगळं सपलं आहे. अफगाणिस्तानला आता पुन्हा शुन्यातून सुरूवात करावी लागेल. तिथे 250 अफगाणी शीख उरले होते. तिथली स्थिती सध्या खूपच वाईट आहे. लोक दहशतीखाली असून कुणावरही विश्वास ठेवता येत नाही. तिथे कोणतंही सरकार नाही, तालिबान्यांची भीती वाटत आहे, असंही खालसा यांनी सांगितलं. 

दरम्यान, C17 हे हवाई दलाचे विमान 107 भारतीयांसह 168 जणांना घेऊन सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हिंडन विमानतळावर उतरले. अफगाणिस्तानातील अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताला दररोज दोन विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. रविवारी अफगाणिस्तानातून तीन वेगवेगळ्या विमानांनी आणखी भारतीयांना आणण्यात आले. त्यामध्ये एअर इंडिया, इंडिगो, विस्तारा या कंपन्यांच्या विमानांचा समावेश आहे. ही विमाने ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे आणि कतारमधील दोहा येथून दिल्लीत आली. 

हिंडन विमानतळावर उतरलेल्या 168 प्रवाशांमध्ये 24 अफगाण शिखांचाही समावेश आहे. यामध्ये खालसा यांच्यासह अनारकली या खासदारांचाही समावेश आहे. यातील बहुतेक प्रवाशांनी पुन्हा अफगाणिस्तानमध्ये जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. बहुतेक जण आठ दिवसांपासून गुरूद्वारामध्येच थांबून होते. तालिबानी तिथे लोकांना शोधून त्यांची तपासणी करत आहेत. 

विमानतळावर विमानाची वाट बघणाऱ्या लोकांना तालिबानी उचलून नेत होते. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. एका युवकाने सांगितले की, मायदेशी परतल्यानंतर खूप बरं वाटत आहे. आता पुन्हा कधीच अफगाणिस्तानमध्ये जाणार नाही. एका महिने आपलं घर तालिबान्यांनी जाळल्याचं सांगितलं. कोणत्याही स्थितीत भारतात येण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. लोकांना तालिबानवर विश्वास नाही. अनेक लोक अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याचे एका तरूणाने सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in