मुल्ला हिबातुल्लाच्या हाताखाली काम करणार अफगाणिस्तानचे अध्यक्ष अन् मंत्री

तालिबानच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचीरचना कशी असेल, याबाबत चर्चा सुरू आहे.
Afghanistan President will work under Haibatullah Akhundzada
Afghanistan President will work under Haibatullah Akhundzada

काबूल : अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबानकडून आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तालिबानचा सर्वेसर्वा असलेला मुल्ला हिबातुल्ला अखुंजादा हा अफगाण सरकार चालवणार आहे. त्याच्या हाताखाली अफगाणिस्तानचे अध्यक्ष आणि मंत्री काम करतील. मागील वीस वर्षे अध्यक्ष हेच सरकारचे सर्वेसर्वा होते. (Afghanistan President will work under Haibatullah Akhundzada)

तालिबानच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाची रचना कशी असेल, याबाबत चर्चा सुरू आहे. अखुंजादा याचं सरकारवर नियंत्रण राहणार आहे. तर या सरकारमध्ये पंतप्रधान किंवा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मंत्री काम करतील. तालिबानकडून जिल्हा व प्रांत स्तरावरील अनेक प्रशासकीय नियुक्त्या केल्या आहेत. तसेच तालिबानने याआधीच्या सरकारमधील सर्व अधिकारी व कमर्चाऱ्यांना पुन्हा काम सुरू करण्याचे आवाहन लगेचच केले होते. त्यानुसार अनेक जण कामावर रुजू झाले आहेत. 

शरियत कायद्यानुसारच चालणार सरकार

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर लगेचच देशात शरियत कायद्यानुसार सरकार चालणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तालिबान असेपर्यंत देशात शरियत कायद्यानुसार अंमलबजावणी होईल. 1996 ते 2001 या पाच वर्षांतही शरियत कायद्यानुसारच सरकार चालवण्यात आलं होतं. त्याला अनेक सुधारणावादी महिलांसह संघटनांनीही विरोध केला होता. या कायद्यानुसार महिलांवर अनेक निर्बंध येणार असल्यानं काही महिलांनी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या उघडपणे मांडल्या होत्या.

कोण आहे अखुंजादा?

मुल्ला हिबातुल्ला अखुंजादा याच्या नेतृत्वाखाली अफगाण सरकार चालणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हिबातुल्ला हा तालिबानच्या प्रमुख पाच नेत्यांपैकी एक असला तरी त्याचाच वरचष्मा राहिला आहे. अमेरिकेच्या हल्यात 2016 मध्ये तालिबानचा संस्थापक मुल्ला मंसूर अख्तर मारला गेल्यानंतर तालिबानची सूत्र मुल्ला हिबातुल्लाच्या हातात आली. त्याचवेळी त्याचं एक छायाचित्र प्रसिध्द करण्यात आलं होतं. त्यानंतर तो कधीच जगासमोर आला नाही. तो खूपच धार्मिक आहे. अख्तर मारला गेल्यानंतर विभागलेल्या तालिबानला संघटित करण्याची महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. 

मुल्ला हिबातुल्ला हा 1990 मध्ये तालिबानमध्ये दाखल झाला. तो मूळचा कंदाहारचा असल्याचं सांगितलं जातं. सध्याही तो तिथंच असल्याचा दावा तालिबानकडून केला जात आहे. 1995 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याच्यावर देशाचा गुन्ह्यांचा आलेख कमी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. 2015 मध्ये तालिबानच्या उपप्रमुख बनला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com