सिद्धूंनी पुन्हा दिला तडका : Advocate General ने साधला निशाणा

पंजाबमध्ये काॅंग्रेसमधील (Punjab Congress) कुरघोडी थांबण्याचे नाव घेईना...
Navjyot Sidhu
Navjyot Sidhu Sarkarnama

चंडीगड : पंजाबमधील राजकीय संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्याचे महाधिवक्ते (ॲडव्होकेट जनरल) विधिज्ञ अमरप्रितसिंग देओल यांनी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे.

Navjyot Sidhu
नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला राजीनामा !;पाहा व्हिडिओ

सिद्धू हे राज्य सरकारच्या कामकाजात अडथळे आणत असून राजकीय फायद्यासाठी ते कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २०१५ मधील एका धार्मिक स्थळाची विटंबना आणि गोळीबारप्रकरणी सिद्धू यांनी देओल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असला तरीसुद्धा पोलिस महासंचालक साहोता आणि देओल राजीनामा देत नाहीतोपर्यंत आपण पदभार स्वीकारणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

Navjyot Sidhu
पंजाब पुन्हा तापलं; मुख्यमंत्री चन्नींनी घेतली थेट कॅप्टनच्या घरी धाव

सिद्धूंच्या आरोपाला देओल यांनी आज उत्तर दिले. सिद्धू हे त्यांच्या राजकीय फायद्यासाठी चुकीची माहिती पसरविण्याचे काम करत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम काही राजकीय घटकांकडून केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंजाब महाधिवक्त्यांच्या कार्यालयाला घटनात्मक दर्जा असून तेथेही राजकारण आणले जात असल्याची खंत देओल यांनी व्यक्त केली. कॅ. अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अतुल नंदा यांनीही महाधिवक्त्याचे पद सोडले होते त्यांच्याजागी एपीएस देओल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com