साठ टक्के आमदारांनी बदलला पक्ष ; 'आयाराम-गयाराम'चे नवं रेकॉर्ड केलं या राज्यानं

पाच वर्षात ६० टक्के आमदारांनी पक्षांतर केले. पक्षांतराची ही टक्केवारी इतिहासातील सर्वात मोठी आहे.
Goa Vidhansabha
Goa Vidhansabhasarkarnama

नवी दिल्ली : राजकारणात 'आयाराम-गयाराम' हा शब्द रुढ झाला होता, तो हरयाणासंदर्भात होता. त्यानंतर तो संपूर्ण देशात रुढ झाला. पण हरयाणानंतर जर कोणाला तो शब्द लागू होत असेल तर तो गोव्याला. गोव्यात कोण कधी कुठल्या पक्षात जाईल काही सांगता येत नाही. कारण गोव्यानं यात रेकॉर्ड केलं असल्याचे एका अहवालात नमूद केलं आहे.

देशातील लोकशाहीच्या इतिहासात गोव्यानं एक नवं रेकॉर्ड केलं आहे. कारण गोव्यातील ६० टक्के आमदारांनी पक्षांतर केलं आहे. गोव्यात ४० विधानसभा (Goa Assembly) जागा आहेत. यातील २४ आमदारांनी पक्ष बदलेला आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षात ६० टक्के आमदारांनी आपला पक्ष बदलेला दिसतो. पक्षातरांची ही टक्केवारी इतिहासातील सर्वात मोठी आहे. एका अहवालानुसार गोव्यातील (Goa Vidhansabha Election) पक्ष बदलणाऱ्या या ६० टक्के आमदारांनी मतदारांचा अपमान केल्याचे म्हटलं आहे.

Goa Vidhansabha
आदित्य ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

एडीआरच्या (Association for Democratic Reforms) अहवालानुसार, (२०१७-२०२२) विधानसभा कार्यकाळात २४ आमदारांनी पक्ष बदलला आहे. देशातील कुठल्याही राज्यात एवढी पक्ष बदलणारे आमदार नाहीत, या आमदारांनी मतदारांचा अनादर केला आहे. या आमदारांनी नैतिकता आणि लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली केली असल्याचे मत एडीआरने नोंदविलं आहे.

गेल्या दीड-दोन महिन्यात दहा आमदारांनी पक्ष सोडले. यातील काही जण कॉग्रेस, काही जण भाजप तर काही जण तृणमूल, आपमध्ये दाखल झाले आहेत. २०१७ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला फक्त तेरा जागा जिंकता आल्या होत्या. पण 'आयाराम-गयाराम'मुळे या पक्षाने आपली आमदार संख्या पाच वर्षात २७ पर्यंत नेली. कॉग्रेसला जनतेने १७ जागा दिल्या होत्या. त्या पक्षाकडे आता फक्त दोन आमदार राहिले आहेत.

दोन आमदार सरकार पाडू शकतात..

गोव्यात ४० सदस्य असलेल्या गोव्यात बहुमतासाठी २१ आमदार म्हणजे बहुमत असते. त्यामुळे दोन आमदार कुणाच्या गळाला लागले तरी येथील सरकार पडते, पक्ष बदलणाऱ्या लोकांना आणि राजकीय पक्षांना गोव्याची जनता वैतागली आहे. गोव्यातील जनता एका पर्यायाच्या शोधात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Goa Vidhansabha
नवनीत राणा स्वतःची टिमकी वाजवत नौटंकी करतात ; शिवसेनेच्या कायदेंचा घणाघात

गोवा विधानसभेची निवडणूक तारीख जाहीर होताच आता उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे पण गोवा भाजपा मध्ये उत्पल पर्रिकर यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षाला रामराम ठोकला आहे. उत्पल पर्रिकर यांनी पणजी मधून तिकीट न मिळाल्याने भाजपाला सोठचिठ्ठी दिली तर पहिल्या यादीमध्ये लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांचंही नाव नसल्याने त्यांनी भाजपा सोडत अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी वर्तवली आहे. उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र आहेत. भाजपाने विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिल्याने पर्सीकर नाराज असून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com