अयोध्येत 'महाराष्ट्र सदन' : आदित्य ठाकरेंकडून २ वर्षांपूर्वीच्या शिळ्या कढीला ऊत

Aditya Thackeray | Sanjay Raut | Ayodhya : २ वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनीही अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याची घोषणा केली होती...
अयोध्येत 'महाराष्ट्र सदन' : आदित्य ठाकरेंकडून २ वर्षांपूर्वीच्या शिळ्या कढीला ऊत
Aditya Thackeray | Sanjay Raut | Ayodhya Sarkarnama

(Aditya Thackeray Ayodhya Visit latest News)

अयोध्या : महाराष्ट्रातून अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची चांगली सोय व्हावी म्हणून राज्य सरकार इथे १०० खोल्यांचे सुसज्ज महाराष्ट्र सदन बांधणार असल्याची घोषणा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली. याशिवाय या सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडे जागेची मागणी करणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार असून अधिकृत पत्रव्यवहार देखील करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (Aditya Thackeray Ayodhya Visit latest News)

मंत्री आदित्य ठाकरे शिवसेना (Shivsena) नेत्यांसमवेत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आदित्य ठाकरे यांच्यासमवेत यावेळी माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, खासदार धैर्यशिल माने आदी उपस्थित होते. (Aditya Thackeray Ayodhya Visit latest News)

शिळ्या कढीला ऊत असल्याची टीका

मात्र आदित्य ठाकरे यांची ही घोषणा म्हणजे २ वर्षांपूर्वीच्या शिळ्या कढीला ऊत असल्याची टीका होवू लागली आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील २ वर्षांपूर्वी अयोध्या दौऱ्यातच याच प्रकारची घोषणा केली होती. शिवाय त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्र सदनासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. आता आदित्य ठाकरे यांच्याकडून हीच घोषणा पुन्हा एकदा करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मार्च २०२० मध्ये ठाकरे सरकारला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येमध्ये श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची चांगली सोय व्हावी म्हणून राज्य सरकार इथे भव्य महाराष्ट्र सदन बांधणार असल्याची घोषणा केली होती. सोबतच त्यांनी योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्र सदनासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. याशिवाय त्यांनी ठाकरे कुटुंबियांच्या वतीने राम मंदिरासाठी १ कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in