लाखो रुपये घेऊनही सनी लिओनी कार्यक्रमाला आलीच नाही; फसवणूक प्रकरणी अखेर गुन्हे शाखेकडून चौकशी - actress sunny leone questioned by kochi crime branch in fraud case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

लाखो रुपये घेऊनही सनी लिओनी कार्यक्रमाला आलीच नाही; फसवणूक प्रकरणी अखेर गुन्हे शाखेकडून चौकशी

वृत्तसंस्था
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

अभिनेत्री सनी लिओनी हिच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल झाली असून, या प्रकरणी गुन्हे शाखेने तिची चौकशी केली आहे. 

कोची : अभिनेत्री सनी लिओनी एका फसणवणूक प्रकरणात चांगलीच अडचणीत आली आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 29 लाख रुपये घेऊनही ती कार्यक्रमास आली नाही, असा आरोप सनीवर ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी कोची गुन्हे शाखेने सनीची काल रात्री (ता.5) चौकशी केली. 

या प्रकरणी आर.शियास या पेरुम्बवूर येथील व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्याने आधी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली होती. नंतर त्यांची ही तक्रार गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली. गुन्हे शाखेने तपास हाती घेतल्यानंतर वेगाने चक्रे हलण्यास सुरवात झाली. सनी ही सध्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पूवर येथे चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहे. तेथेच गुन्हे शाखेने तिची चौकशी केली. तिचा जबाब गुन्हे शाखेने नोंदवून घेतला आहे. 

शियास यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी दोन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यासाठी सनी लिओनीला 29 लाख रुपये देण्याचे ठरले होते. यानुसार तिला 29 लाख रुपये देण्यात आले होते. परंतु, तिने पैसे घेऊनही या दोन्ही कार्यक्रमांना दांडी मारली. अशा प्रकारे तिने पैसे घेऊन फसवणूक केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चौकशीत सनी लिओनी हिने कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे केले आहे. याचबरोबर नियोजित कार्यक्रम पाच वेळा पुढे ढकलण्यात आला होता. यामुळे या गोंधळासाठी आयोजक जबाबदार आहेत. 

या प्रकरणी सनी आणि कार्यक्रमांच्या आयोजकांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. पुन्हा कार्यक्रम घेण्याची तयारी असेल तर मी कार्यक्रमाला हजर राहीन, अशी भूमिकाही सनीने घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख