पोलीस नसते तर माझं 'मॉब लिंचिंग' झालं असतं! कंगनाची आपबीती

एवढा वाद ओढवूनही पंजाबमध्ये जाणे कंगना राणावतला महागात पडले आहे.
पोलीस नसते तर माझं 'मॉब लिंचिंग' झालं असतं! कंगनाची आपबीती
Kangana RanautSarkarnama

नवी दिल्ली : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य (Independence) हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) वादात सापडली होती. यानंतर तिने शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ती अडचणीत आली होती. एवढा वाद ओढवूनही पंजाबमध्ये (Punjab) जाणे तिला महागात पडले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी तिची मोटार अडवून माफीची मागणी केल्याने मोठा गदारोळ उडाला.

कंगना आज चंडीगडमधून मनालीला जात होती. चंडीगड-उना राष्ट्रीय महामार्गावरील रोपड टोलनाक्यावर तिला आंदोलक शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी तिची कार अडवली. त्यावेळी तिच्यासोबत सुरक्षाव्यवस्थाही होती. शेतकऱ्यांनी तिच्याकडे माफीची मागणी केली. अखेर पोलिसांनी तिला दुसऱ्या मार्गाने पुढे नेले. या घटनेबाबत कंगनानेच माहिती दिली आहे. तिने म्हटले आहे की, पंजाबमध्ये पाऊल ठेवताच जमावाने हल्ला केला. तिथे पोलीस उपस्थित नसते तर माझी हत्याच झाली असतील. अशा लोकांना लाज वाटायला पाहिजे.

Kangana Ranaut
लोकांचा विश्वास बसावा म्हणून गडकरींनी थेट कारच घेतली विकत!

ठार मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत, असा दावा कंगनाने नुकताच केला आहे. याबाबत तिने हिमाचल प्रदेश पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी हिमाचल पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे. कंगनाने म्हटले आहे की, भटिंड्यातील एक व्यक्ती मला जाहीरपणे ठार मारण्याची धमकी देत आहे. मी अशा प्रकारच्या भ्याड धमक्यांना घाबरत नाही. देशाच्या विरोधात षडयंत्र करणारे आणि दहशतवादी यांच्या विरोधात मी बोलतच राहीन. मग ते जवानांची हत्या करणारे नक्षलवादी, टुकडे-टुकडे गँग अथवा खलिस्तानी असोत.

Kangana Ranaut
परमबीरसिंहांच्या निलंबनावरून मानापमान नाट्य! आदेश स्वीकारण्यास थेट नकार

शिखांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईतही कंगनाविरोधात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने ही तक्रार दिली आहे. याचबरोबर शिरोमणी अकाली दलानेही कंगनाच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला खलिस्ताना ठरवून शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी दहशतवादी असा कंगनाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.