ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी बंद झाले अन् कंगना म्हणाली... - actress kangana ranaut twitter account permanently banned | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी बंद झाले अन् कंगना म्हणाली...

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचे टि्वटर अकाउंट कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. 

मुंबई : वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचे टि्वटर अकाउंट कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधाने करीत असल्यामुळे कंगनावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे संतापलेल्या कंगनाने उलट ट्विटरलाच सुनावले आहे. (kangana ranaut twitter account permanently banned)  

कंगनाचे अकाउंट आधी ट्विटरने तात्पुरते बंद केले होते. आता ते कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. याला कारण आहेत कंगनाची प्रक्षोभक ट्विट. कंगनाने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल आक्षेपार्ह ट्विट केली होती. कंगनाचे वर्तन द्वेष पररवणारे आणि इतरांना दूषणे देणारे आहे, असे ट्विटरने म्हटले आहे. 

ट्विटरच्या या कारवाईवर कंगनाचा तिळपापड झाला आहे. तिने ट्विटरची गरजच नसल्याची भूमिका घेतली आहे. तिने म्हटले आहे की, माझा आवाज उठवण्यासाठी माझ्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. तसेच, चित्रपटातील माझी कला हा ही एक प्लॅटफॉर्म माझ्यासाठी आहे. 

हेही वाचा : महाराष्ट्रासह 10 राज्यांतच कोरोनाचे 71 टक्के नवे रुग्ण 

बंगालमधील हिंसाचाराबद्दल केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले होते की, हे अतिशय भयानक आहे. गुंडांना मारण्यासाठी आपण आणखी मोठे गुंड व्हायला हवे. ती मोकाट सुटलेल्या राक्षासारखी आहे. आता मोदीजी 2000मध्ये सुरवातीला घेतलेले विराट रुप पुन्हा एकदा धारण करुन तिला धडा शिकवा. 

हेही वाचा : देशातील रुग्णसंख्या 2 कोटींवर..जाणून घ्या रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 

ट्विटरने सध्या आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बंद केले होते. त्यानंतर काही दिवसांनी ट्विटरवरुन वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या कंगनावर कारवाई झाली होती. ट्विटरने तिचे अकाउंट तात्पुरते बंद केले होते. यानंतर कंगनाने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांच्यावरच निशाना साधला होता.  

त्यावेळी कंगनाने म्हटले होते की, लिबरल लोक आपले काका जॅक यांच्याकडे जाऊन रडत आहेत. त्यामुळे माझ्या अकाउंटवर काही काळासाठी निर्बंध आणले आहेत. ते मला धमक्याही देत आहेत. ट्विटरवरच अकाउंट म्हणजेच माझी व्हर्च्युअल ओळख देशासाठी शहीद होऊ शकते. मात्र, माझं रिलोडेड देशभक्तीचं व्हर्जन सिनेमांद्वारे पुन्हा पुन्हा परत येईल. याद्वारे तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख