कंगना म्हणते, मला तुरुंगात जायचंय!

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन सुरू असलेला गदारोळ अद्याप शमलेला नाही. यातच ती नवनवीन वक्तव्ये करुन वाद आणखी वाढवत आहे.
actress kangana ranaut says i am waiting to be in jail soon
actress kangana ranaut says i am waiting to be in jail soon

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. त्यानंतरही कंगनाने वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरूच ठेवले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. आता कंगनाने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

कंगनाने दोन समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तापस करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. याआधी सुशांतसिंह प्रकरणात कंगनाने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश न्यायालयानेच मुंबई पोलिसांना दिल्याने कंगना चांगलीच अडचणीत आली आहे. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. यामुळे कंगना चांगलीच अडचणीत आल्याचे मानले जात आहे. कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर येत्या सोमवारी (ता.26) आणि मंगळवारी (ता.27) हजर राहण्यास सांगण्यता आले आहे. यामुळे कंगनाची चौकशी सोमवारपासून सुरू होणार आहे. या चौकशीसाठी कंगनाला शिमल्यातून मुंबईत परतावे लागणार आहे. 

कंगनाने वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरूच ठेवले आहे. तिने ट्विटरवर म्हटले आहे की, मी सावरकर, नेताजी बोस आणि झाशीची राणी यांची पूजा करते. मला आज सरकार तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. यातून हेच सिद्ध होते की मी बरोबर होते. माझ्या दैवतांप्रमाणे मी सुद्धा तुरुंगात जाण्याची प्रतीक्षा करीत आहे. यातून माझ्या आयुष्याला अर्थ मिळेल. जय हिंद. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com