कंगना म्हणते, पैसा अन् नाव तर दाऊदही कमावतो... - actress kangana ranaut criticizes bollywood industry and karan johar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

कंगना म्हणते, पैसा अन् नाव तर दाऊदही कमावतो...

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सुरू असलेला गदारोळ सुरूच आहे. कंगना आता आणखी वादग्रस्त विधाने करुन रोज नवीन वाद निर्माण करीत आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ अद्याप संपलेला नाही. कंगना ही मनालीला तिच्या घरी परतली असली तरी तिने ट्विटरवर वादग्रस्त विधाने करण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. कंगनाने आज हिंदी चित्रपटसृष्टीच्या योगदानाबद्दलच प्रश्न उपस्थित करीत तिला टाकाऊ ठरवले आहे. 

कंगना आणि शिवसेना यांच्यात रोज जोरदार सामना रंगला आहे. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरत असताना तिने नुकतीच थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. कंगना आता हिमाचल प्रदेशला तिच्या घरी परत गेली आहे. जिवाला घाबरून मुंबई सोडत असल्याचे ट्विट तिने मुंबई सोडताना केले होते. 

कंगनाने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा शिवसेनेने दिला होता. कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते. यावर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना लक्ष्य केले होते. 

कंगनाने आज चित्रपटसृ़ष्टीवर ट्विटरवरुन हल्लाबोल सुरूच ठेवला. तिने म्हटले आहे की,  बॉलीवूडला सगळे जग हसते. बॉलीवूडने आतापर्यंत काय निर्माण केले? देशद्रोह, दहशतवाद, ड्रग्ज संस्कृती, आयटन नंबर यासारख्या गोष्टींना चित्रपटात स्थान दिले. पैसे आणि नाव तर काय दाऊदही कमावतो. परंतु, इज्जत हवी असेल तर ती कमवा. काळ्या कारवाया लपवण्याचा प्रयत्न करु नका. 

कंगनाने निर्माता करण जोहरलाही लक्ष्य केले. याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचाही तिने चुकीचा नामोल्लेख केला. तिने म्हटले आहे की, ही चित्रपटसृष्टी फक्त करण जोहर आणि त्याच्या बापाची नाही. बाबासाहेब फाळके यांच्यापासून सर्व कलाकार आणि कामगारांनी बनवली आहे. सीमेचे संरक्षण करणारे जवान, संविधानाची रक्षा करणारे नेते आणि तिकिट खरेदी करुन चित्रपट पाहणारे प्रेक्षक या सर्वांनी भारतीय चित्रपटसृष्टी बनवली आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख