होम क्वारंटाईन टाळण्यासाठी कंगनाने लढवली नामी शक्कल!

अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. कंगनाला होम क्वारंटाईन करण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता.
actress kangana ranaut and rangoli chandel tests covid19 negative
actress kangana ranaut and rangoli chandel tests covid19 negative

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. वांद्र्यातील पाली हिल येथील तिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने आज पाडून टाकले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. दरम्यान, कंगनाला मुंबईत आल्यानंतर होम क्वारंटाईन करण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. कंगना आता चंडीगडवरून विमानाने मुंबईला रवाना झाली असून, तिने क्वारंटाईन टाळण्यासाठी नामी शक्कल लढविली आहे.

मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. कंगनाच्या कर्मचाऱ्यांनी नोटीस न स्वीकारल्याने बंगल्याच्या दर्शनी भागात ती लावण्यात आली होती. बंगल्यात झालेल्या कामाच्या परवानगीची कागदपत्रे 24 तासांत सादर करण्याची मुदत तिला देण्यात आली होती. तिने 24 तासांत पुरावे सादर न केल्यास पालिका हे बांधकाम बेकायदा ठरवून तोडू शकते, असा इशारा देण्यात आला होता. ही मुदत संपल्यानंतर महापालिकेचे पथक आज बुलडोझर घेऊन कंगनाच्या बंगल्यावर गेले. पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत भाग हातोडा आणि बुलडोझरच्या सहाय्याने पाडून टाकला. 

यावर कंगना संतापली असून, तिने ट्विटरवर मुंबई महापालिकेच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. तिने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केलेली तुलना योग्य असल्याचा दावा केला आहे. तिने म्हटले आहे की, ही इमारत माझ्यासाठी राम मंदिराप्रमाणे होती. आज तेथे बाबर आला आहे. आज पुन्हा इतिहास घडत असून, मंदिर पाडले जात आहे. परंतु, लक्षात ठेवा मंदिर पुन्हा बनेल. जय श्री राम! 

कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. तिने 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचे जाहीर केले होते. यावर शिवसेनेने कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला होम क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे कंगनाने मुंबईला जाण्यासाठी जोरदार तयारी केली. तिने कालच कोरोना चाचणी केली. मुंबईत गेल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावे लागू नये म्हणून तिने ही शक्कल लढविली. 

कंगनाच्या कोरोना चाचणीसाठी हिमाचल प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला. आरोग्य विभागाने काल कंगनाची पहिल्यांदा चाचणी केली. त्यात कोणताही ठोस निष्कर्ष समोर आला नाही. त्यामुळे काल रात्री उशिरा पुन्हा तिची चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याला हिमाचल प्रदेशच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. 

कंगनासोबत तिची बहीण रंगोली चंडेल आणि आणखी एका व्यक्तीची चाचणी करण्यात आली होती. कंगना आज सकाळी वाय सुरक्षेसह चंडीगडमधील चंडीगड विमानतळावर आली. तेथून विमानाने ती मुंबईकडे रवाना झाली आहे. ती सायंकाळपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com