सुशांतच्या कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर; एकाचवेळी 5 जणांचा मृत्यू
Sushant Singh RajputSarkarnama

सुशांतच्या कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर; एकाचवेळी 5 जणांचा मृत्यू

सुशांतच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असताना आता त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला दीड वर्ष होत आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुशांतच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असताना आता त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पाच नातेवाईकांचा एकाचवेळी अपघातात मृत्यू झाला आहे.

बिहारमधील लखीसराय येथे आज पहाटे एका अपघातात सात जण ठार झाले. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. या अपघातात ठार झालेल्यांपैकी 5 जण सुशांतचे नातेवाईक आहेत. या अपघातात कार चालकही ठार झाला. ट्रक आणि टाटा सुमो गाडीची धडक होऊन हा अपघात घडला. अपघातातील मृतांना शवविच्छेदनासाठी लखीसराय येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सुशांतच्या बहिणीचे पती हरियाणात अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत. त्यांच्या बहिणीचे पती लालजीतसिंह, त्यांची दोन मुले, दोन मुली आणि बहिणीचा अपघाती मृत्यू झाला. लालजीतसिंह हे पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी परिवारासोबत पाटण्यात राहतात. ते पत्नीच्या उत्तर कार्यासाठी परिवारासह गावी जात होते. त्यावेळी त्यांच्या टाटा सुमोला ट्रकची धडक होऊन हा अपघात घडला.

Sushant Singh Rajput
भाई जगतापांनी मला शिव्या दिल्या! सिद्दीकींची थेट सोनिया गांधींकडे तक्रार

सुशांत हा 14 जून 2020 रोजी त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता.

Sushant Singh Rajput
अखेर ठरलं! पायलट यांना दिल्लीत प्रमोशन अन् समर्थकांना राज्यात मंत्रिपदे

या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in