आठवडाभरापूर्वी सपत्नीक कोरोना लस घेणारे आशुतोष राणा पॉझिटिव्ह आले अन् म्हणाले...

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. आता सरकारने लसीकरणावर भर दिला आहे.
actor ashutosh rana found covid 19 positive after taking vaccine
actor ashutosh rana found covid 19 positive after taking vaccine

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. अभिनेता आशुतोष राणा हा आता कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याने आणि त्याची पत्नी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आठवडाभरापूर्वीच कोरोना लस घेतली होती. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राणा यांनी यावर भाष्य केले आहे. 

आता आशुतोष राणा यांना ते पॉझिटिव्ह आल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काल (ता.13) चैत्र नवरात्र हा अतिशय शुभ दिवस होता. शरीरात निर्माण होत असलेल्या विकाराबद्दल या शुभ दिवशी मला वेळीच माहिती मिळाली. या विकाराला शरीरातून लवकरात लवकर बाहेर काढण्याच्या दिशेने मी पावले उचलली आहेत. माझ्या संपर्कात 7 एप्रिलपासून आलेल्या सर्वांना त्यांची चाचणी करुन घ्यावी, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी चाचणी करुन घेतली आहे. त्यांच्या चाचणीचे अहवाल उद्या मिळणार आहेत. 

राणा आणि त्यांची पत्नी रेणुका शहाणे यांनी 6 एप्रिलला कोरोना लस घेतली होती. याची माहिती शहाणे यांनी ट्विट करुन दिली होती. त्यांनी दोघांचा फोटोही ट्विट केला होता. त्यांनी म्हटले होते की, कोविड लसीकरण केंद्राच्या उत्तम सेवेसाठी मुंबई महापालिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व कोविड लसीकरण केंद्राच्या सर्व वैद्यकीय चिकित्सकांचे, परिचारिकांचे विशेष आभार. आज आम्ही लशीचा पहिला डोस घेतला. लसीकरण करून घ्या व आवर्जून मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा व हात सॅनिटाईझ करत रहा.

शात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, मागील 24 तासांत तब्बल 1 लाख 84 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात 7 एप्रिलपासून दररोज लाखाच्या वर नवीन रुग्ण सापडत आहेत.. याचवेळी देशात कोरोना लशीची टंचाई निर्माण झाली आहे. यावरुन केंद्र सरकार आणि काही राज्यांमध्ये जुंपली आहे. अशा परिस्थितीत कोरोना लशीचे डोस गायब होण्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे.  

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com