यूपीत योगींना पुन्हा सत्तेचा योग : सपा स्पर्धेत तर काॅंग्रेस बेहाल

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केल्या आहेत.
Akhilesh Yadav, Yogi Adityanath, Priyanka Gandhi,
Mayawati
Akhilesh Yadav, Yogi Adityanath, Priyanka Gandhi, Mayawatisarkarnama

लखनै : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केल्या आहेत. त्यानंतर देशात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. या पाचही राज्यामध्ये सर्वाचे लक्ष लागले आहे ते उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) निवडणुकीकडे. या निवडणुकीत भाजप (BJP) सत्ता राखणार की विरोधी पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, एबीपी न्यूज आणि सी व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये भाजप या राज्यात सत्ता कायम ठेवणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला 100 जागांचे नुकसान होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तर समाजवादी पार्टीला 100 जागांचा फायदा होणार असून काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागा मिळतील असे सांगितले आहे.

Akhilesh Yadav, Yogi Adityanath, Priyanka Gandhi,
Mayawati
पाच राज्यांच्या निवडणुकीचा संग्राम; पक्षीय बलाबल काय? हे मुद्दे गाजणार

उत्तर प्रदेशमध्ये मध्ये 2017 ला भाजपला ३२५ जागा मिळाल्या होत्या. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 223 ते 235 जागा मिळतील असे सांगितले आहे. सपाला 145 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल, असे म्हटले आहे. सध्यातरी उत्तर प्रदेशची निवडणूक ही भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशीच असणार असल्याचे सष्ठ केले आहे. भाजपला जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे परीक्षण केले जाणार आहे.

काँग्रेसची परीक्षा

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यासाठी ही निवडणूक परीक्षा असणार आहे. या ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागा मिळतील असे सांगितले आहे. प्रियांका गांधींनी हातरस, लखीमपूर खिरी घटनांमध्ये प्रत्येकवेळी सर्वसामान्यांची बाजू मांडण्यात अग्रेसर राहिल्या आहेत. मात्र, तरीही ओपिनियन पोलच्या कलानुसार नागरिकांनी काँग्रेसला स्पष्टपणे नाकारल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांना 43 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना 34 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. त्यानंतर 14 टक्के लोकांनी मायावतींना तर 4 टक्केच लोकांनी प्रियंका गांधींना पसंती दिली असल्याचा दावा सर्वेमध्ये करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश - एकूण - 403

कुणाला किती जागा?

भाजप 223-235

सपा 145-157

बसपा 8-16

काँग्रेस 3-7

इतर 4-8

Akhilesh Yadav, Yogi Adityanath, Priyanka Gandhi,
Mayawati
भाजपच्या हालचाली वाढल्या; मुख्यमंत्री योगींना दिल्लीत घेतलं बोलवून

कोणत्या पक्षाला किती टक्के मते?

भाजप 41.5

सपा 33.3

बसपा 12.9

काँग्रेस 7.1

इतर 5.3

सध्या कोणत्या पक्षाला किती जागा आहेत.

भाजप- 325

समाजवादी पार्टीला -47

बसपला -19

काँग्रेस -07

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in