गोव्यात पुन्हा कमळ फुलणार; केजरीवालांचा पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत!

सर्व्हेमध्ये भाजपचे प्रमोद सांवत यांना 34 टक्के मते मिळाली आहेत.
Goa Assembly Elections
Goa Assembly Electionssarkarnama

पणजी : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गोव्यातील (Goa) राजकीय वातवरण तापले आहे. गोव्यामध्ये काँग्रेसने (Congress) आघाडी घेत पहिली उमेदवार यादीही जाहीर केली आहे. त्या पाठोपाट आम आदमी पार्टीने उमेदवार यादी जाहीर करत ताकतीन रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गोव्यात पुन्हा एकदा भाजप (BJP) सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Goa Assembly Elections
यूपीत योगींना पुन्हा सत्तेचा योग : सपा स्पर्धेत तर काॅंग्रेस बेहाल

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पार्टीने (GFP) काँग्रेसशी आघाडी केली. अशातच एबीपी आणि सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून गोव्यातील जनतेचा कौल जाणून घेण्यात आला आहे. या सर्व्हेत गोव्यात भाजपला 19 ते 30, आपला 5 ते 9, काँग्रेसला 4 ते 8, मगोप 2 ते 6 तर इतर पक्षांना चार जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गोव्यात भाजपला 32 टक्के, आपला 22.5 टक्के, कॉंग्रेसला 19.8, मगोपला 7.7 टक्के आणि इतर पक्षांना 18.1 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार गोव्यात भाजपला 2017 च्या तुलनेत 8 जागांचा फायदा होणार असल्याचे सागण्यात येत आहे. तर फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

फेव्हरेट मुख्यमंत्री कोण?

या सर्व्हेमध्ये भाजपचे प्रमोद सांवत यांना 34 टक्के मते मिळाली आहेत. तर आपच्या उमेदवाराला 19 टक्के मते मिळाली आहे. तर भाजपचे विश्वजीत राणे यांना 16 टक्के मते मिळाली आहे. कॉंग्रेसचे दिगंबर कामत यांना 9 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर इतरांना 22 टक्के लोकांनी पसंती दाखवली आहे.

Goa Assembly Elections
पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का देत आप सत्तेच्या जवळ? मुख्यमंत्री म्हणून चन्नींना पसंती!

सध्याचे पक्षीय बलाबल

गोव्यामध्ये एकूण 40 जागा आहेत.

भाजप- 17

काँग्रेस- 13

म. गोमांतक-03

गोवा फॉरवर्ड पक्ष- 03

इतर- 04

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com