मोदी सरकार अन् भाजपला सिंगापूरची तर केजरीवालांना लहान मुलांची काळजी!

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, आताच तिसऱ्या लाटेवरुन राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे.
aap slams bjp government over row of singapore covid variant
aap slams bjp government over row of singapore covid variant

नवी दिल्ली : देशात कोरोनाची (Covid19)  तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी सिंगापूरमधील कोरोना विषाणूच्या प्रकाराबाबत (Singapore Corona Variant) ट्विट केले होते. यावर भाजप सरकाने सिंगापूरची बाजू घेत केजरीवालांवर निशाणा साधला होता. याला आता आम आदमी पक्षाने (AAP) प्रत्युत्तर दिले आहे. 

केजरीवाल यांनी ट्विट करताच त्याला सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने उत्तर दिले होते. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खुलासा करणारे उत्तर दिले होते. दोन्ही बाजूंकडून आज सकाळपासून या प्रकरणी खुलासे करण्याचे सत्र सुरू होते. भारत सरकारने तर केजरीवाल हे संपूर्ण भारताच्या वतीने बोलू शकत नाहीत, अशी भूमिका घेतली. 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर म्हणाले की, कोरोना विरोधातील लढाईत सिंगापूर आणि भारत हे दीर्घकालीन साथीदार आहेत. भारताला ऑक्सिजनसह इतर उपकरणांचा पुरवठा करण्यात सिंगापूरची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यांनी आपल्यासाठी त्यांची सैन्य विमाने तैनात केली होती. ही दीर्घकालीन भागीदारी बिघडू शकते हे माहिती असताना बेजबाबदारपणे विधाने करण्यात आली. मी तुम्हाला सांगू इच्छितो की दिल्लीचे मुख्यमंत्री संपूर्ण भारतासाठी बोलत नाहीत.  

यावर 'आप'ने मोदी सरकारला उत्तर दिले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकारला सिंगापूरची काळजी आहे. तर केजरीवाल यांना लहान मुलांची काळजी आहे. भाजपकडून प्रत्येक गोष्टीचे राजकारण सुरू आहे. ते लहान मुलांना लस पुरवू शकत नाहीत पण त्यांना सिंगापूरबद्दल काळजी आहे. स्वत:ची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांची लस निर्यात केली. केंद्र सरकार आणि भाजपने त्यांची प्रतिमा जपावी पण आम्ही आमच्या मुलांची काळजी घेत राहू. 

केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटले होते की, सिंगापूरहून येणारी सर्व विमाने केंद्र सरकारने ताबडतोब बंद करावीत. सिंगापूरमध्ये सापडणारा कोरोनाचा विषाणूचा प्रकार दिल्लीत येऊ शकते. तो दिल्लीत आल्यास कोरोना संसर्गाची तिसरी लाट येईल. सिंगापूरमधील हा विषाणूचा प्रकार लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक आहे. याचबरोबर केंद्र सरकारने लहान मुलांसाठी लस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com