Congress

Congress

Sarkarnama

निमित्त महापौर पदाच्या निवडणुकीचं; काँग्रेसला मिळणार नवा राजकीय भिडू

देशात महाविकास आघाडीच्या प्रयोगाची चर्चा असताना आता काँग्रेसला चंदीगडमध्ये नवा सहकारी मिळण्याची शक्यता आहे.

चंडीगड : पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीआधी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. चंडीगड महापालिका निवडणुकीत आपने मुसंडी मारत सर्वाधिक जागा पटकावल्या असून, भाजपल्या दुसऱ्या क्रमांकावर फेकले आहे. आता चंदीगडमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नवं राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे.

आपने सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेससमोर हात पसरले आहेत. तसेच काँग्रेसनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. येत्या 8 जानेवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होत आहे. नगरसेवकांची फोडाफोडी टाळण्यासाठी आप व काँग्रेसने सर्व नगरसेवकांना दिल्लीला हलवले आहे. भाजपला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी आपने काँग्रेससमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
महाविकास आघाडीची गोव्यातही हवा; राजकीय हालचालींना वेग

पहिले वर्ष आपला महापौर पदासाठी काँग्रेसने पाठिंबा द्यावा. त्यानंतर पुढील वर्षी आपकडून काँग्रेसला पाठिंबा दिला जाईल, असा हा प्रस्ताव आहे. त्यावर काँग्रेसकडूनही विचार सुरू आहे. त्यामुळे हा प्रस्ताव दोन्ही बाजूला मंजूर झाल्यास देशात पुन्हा नवं राजकीय समीकरण उदयास येईल. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. आता दिल्लीसह इतर राज्यांत काँग्रेसवर सडकून टीका करणारा आम आदमी पक्षही भाजपला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना गृहमंत्रिपद हवं असल्यास एका मिनिटांत राजीनामा देईन!

दरम्यान, पंजाब (Punjab) आणि हरियाना (Haryana) या राज्यांची राजधानी असलेल्या चंडीगडमधील (Chandigarh) महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. चंडीगड महापालिकेतील (Chandigad Municipal Corporation) 35 पैकी 14 जागा आपने (AAP) जिंकल्या आहेत. भाजप (BJP) 12 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस (Congress) 8 जागा मिळवत तिसरा स्थानी आहे. अकाली दलाला (Akali Dal) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपचे आधी महापौर असलेले रविकांत शर्मा आमि दवेश मौडगील हे दोघेपी आपच्या उमेदवारांकडून पराभूत झाले आहेत. आपलाही या निवडणुकीत एक धक्का बसला असून, प्रचार प्रमुख चंदरमुखी शर्मा पराभूत झाले आहेत.

मागील महापालिका निवडणुकीत भाजपने 20 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या अकाली दलाला एक जागा मिळाली होती. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर अकाली दलाने भाजपसोबतची आघाडी तोडली होती. काँग्रेसला मागील निवडणुकीत 4 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने आता आपल्या जागा दुपटीने वाढवल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com