मोदीजी, किती शेतकऱ्यांचा बळी जाऊ देणार? आपचे खासदार संतप्त

आपचे खासदार संजय सिंह (MP Sanjay Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. मोदीं सरकारला त्यांनी धारेवर धरलं आहे.

मोदीजी, किती शेतकऱ्यांचा बळी जाऊ देणार? आपचे खासदार संतप्त
PM Narendra Modi, MP Sanjay Singhsarkarnama

नवी दिल्ली : लखीमपूर खिरी उत्तर प्रदेश) जिल्हयात झालेल्या हिंसाचारात मोटार अंगावरून गेल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार आंदोलक शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे विविध स्तरावर या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आपचे खासदार संजय सिंह (MP Sanjay Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. संजय सिंह यांनी टि्वट करुन मोदीं सरकारला धारेवर धरलं आहे.

आपल्या टि्वटमध्ये खासदार संजय सिंह म्हणतात की, “सत्तेची अशी नशा तुम्ही कधी पहिली किंवा ऐकली नसेल. ३ आंदोलक शेतकऱ्यांना मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली चिरडून मारलं. किती शेतकऱ्यांचा बळी जाऊ देणार मोदीजी?, मारेकऱ्यांना अटक करा, सीबीआय चौकशी करा, कुटुंबाला नुकसानभरपाई द्या.”

PM Narendra Modi, MP Sanjay Singh
ठाकरे सरकार मराठावाडा-विदर्भ विरोधी ; फडणवीसांचे टीकास्त्र

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे काल लखीमपूर येथे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलन शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घातल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यूपीतील लखीमपूर खिरी येथे एका कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आले होते.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले, ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार शेतकरी आणि चार भाजपचे कार्यकर्ते आहेत.

Related Stories

No stories found.