Delhi Assembly News
Delhi Assembly News sarkarnama

Delhi Assembly News : आमदाराने विधानसभेत झळकवले लाचेच्या नोटांचे बंडल

Delhi Assembly News : . हे लोक इतके दबंग आहेत की, माझ्यासोबतही काही अनुचित घडू शकते.

Delhi Assembly News : दिल्लीच्या रिठाला विधानसभेचे आमदार मोहिंदर गोयल यांनी आज (बुधवारी) विधानसभेत त्यांना लाचेसाठी टोकन म्हणून देण्यात आलेल्या नोटा दाखवल्या. त्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यांनी लाचेच्या नोटा दाखवल्याने सभागृहातील उपस्थितांना धक्का बसला.

डाँ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील नोकरी भरतीत झालेल्या गैरप्रकाराबाबत विधानसभेत गोयल यांनी आज आवाज उठवला. या नोकरी भरतीत विविध पदासाठी काढण्यात आलेल्या नोकरी भरती कंत्राटात वरिष्ठ पातळील मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा मुद्या त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Delhi Assembly News
Shinde Government News : शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट ; 'नियमित कर्ज फेडणाऱ्या..'

विधानसभेचे कामकाज सुरु झाले तेव्हा गोयल एका पिशवीत चक्क १५ लाखांच्या नोटांचे बंडल घेऊन सभागृहात आले. पिशवीतील नोटा त्यांनी समोरील टेबलवर ठेवल्या.

नोटांचे बंडल हातात घेऊन ते म्हणाले, "या नोकरी भरतीत नियमानुसार 80 टक्के भरती जुन्या कर्मचाऱ्यांची करणे गरजेचे आहे. पण या नियमाकडे दुर्लक्ष करुन या नोकरी भरतीत मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात येत आहे, मला गप्प राहण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला"

Delhi Assembly News
Nawab Malik News : भाजप नेत्याकडून मलिकांचा 'फर्जीवाडा' उघड ; 'एका महिलेला..'

"हा टोकन मनी आहे जो मला लाच म्हणून देण्यात आला होता. मी मुख्य सचिव आणि एलजी यांना पैशाच्या बदल्यात नोकरी देण्याचा मुद्दादेखील उपस्थित केला होता. मी एक पत्र लिहिले. मी धोका पत्करून हे काम करत आहे. हे लोक इतके दबंग आहेत की, माझ्यासोबतही काही अनुचित घडू शकते. आवाज उठवू नये म्हणून मला पैशांच्या स्वरूपात लाच देण्यात आली,' असे गोयल म्हणाले.

गोयल यांच्या या आरोपानंतर भाजपचे आमदार अभय वर्मा, अजय महावर, ओ.पी. शर्मा, अनिल वाजपेयी यांनी सभागृहात गोंधळ केला. अध्यक्षांच्या आदेशानंतर त्यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांनी गोयल यांच्या सुरक्षेबाबत कुठलाही आदेश दिला नाही. दिल्ली पोलिस त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता आहे. आणखी काही भष्ट्राचाराची प्रकरणे गोयल समोर आणणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com