'आप' मंत्री जैनांचा नवा व्हिडीओ समोर..तुरूंगात लज्जतदार खाद्यपदार्थ अन् फळावर मारला ताव...

AAP : सत्येंद्र जैन यांचे वजन ८ किलोंनी वाढले आहे.
Satyendra Jain latest news
Satyendra Jain latest newssarkarnama

नवी दिल्ली : दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्याबाबतचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही.त्यांच्याबाबत आधी ठग सुकेस चंद्रशेखरने गंभीर आरोप केले, आता तिहार तुरुंगाच्या बॅरेकमधून एकामागून एक त्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.

ताज्या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन फळफलावळ व लज्जतदार पदार्थ खाताना दिसत आहेत. या व्हिडिओवरून भाजपने (BJP) ‘ जैन हे तुरुंगापेक्षा 'रिसॉर्ट'मध्येच रहात आहेत,असे सांगून पुन्हा आम आदमी पक्षावर (AAP) हल्लाबोल केला आहे. (Satyendra Jain latest news)

Satyendra Jain latest news
आदित्य ठाकरेंच्या राजकारणाचा 'बिहारी पॅटर्न'! तेजस्वी यादवांनंतर नितीश कुमारांचीही भेट

ताज्या व्हिडिओमध्ये जैन यांच्या कोठडीतील पलंगावर तीन वेगवेगळे बॉक्स दिसत आहेत,ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ व फळे खाताना जैन दिसत आहेत. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात असताना सत्येंद्र जैन यांचे वजन ८ किलोंनी वाढले आहे. जैन यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले की तुरुंगात गेल्यापासून जैन यांचे २८ किलो वजन कमी झाले आहे.

जैन यांचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, आम्ही हा व्हिडिओ न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून देऊ.दुसरीकडे कारागृह अधिकाऱ्यांना मंत्र्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी विनंतीही न्यायालयासमोर करण्यात आली आहे.जैन गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या धार्मिक श्रध्देनुसार फक्त फळे,भाज्या आणि सुकामेवा किंवा खजूर खातात आणि ते सर्व कैद्यांसाठी उपलब्ध असलेल्या रेशनच्या कोट्यातून हे साहित्य खरेदी करतात, असाही दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Satyendra Jain latest news
Bharat Jodo : विस्कटलेले दलित, मुस्लीम, आदिवासी आणि ओबीसी ही यात्रा जोडेल का?

भाजप नेते काय म्हणतात?

"बलात्कारातील आरोपीद्वारे मसाज केल्यानंतर आणि त्याला फिजिओथेरपिस्ट म्हटल्यानंतर जैन हे चविष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. अटेंडंट्स त्यांना असे जेवण देतात की जणू ते सुट्टीच्या दिवशी रिसॉर्टमध्ये आहेत", अशी टीका शहजाद पूनावाला यांनी केली आहे.

तर तुरुंगात राहूनही सत्येंद्र जैन यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आलेले नाही.आता तर त्यांना मसाजपासून पॅकबंद अन्नापर्यंतच्या सेवा दिल्या जात आहेत, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com