सत्ताधारी भाजपला 'आप'चे नगरसेवक करुन देतील 'नानी'ची आठवण!

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात 'आप'ने लक्षणीय यश मिळवले आहे.
aap leader arvind kejariwal meets newly elected coporators of surat
aap leader arvind kejariwal meets newly elected coporators of surat

सुरत : सुरतच्या महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) चांगले यश मिळाले  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्येच 'आप'ने आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीचे मुख्यमंत्री व 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल हे आज सुरतला जनतेचे आभार मानण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपला थेट इशारा दिला. सत्ताधाऱ्यांना 'नानी'ची आठवण करून द्यावी, असे आवाहनही त्यांनी पक्षाच्या नगरसेवकांना केले. 

गुजरातमध्ये 'आप'ने पहिल्यांदाच एखाद्या महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार उतरवले होते. त्यात 'आप'ने २७ जागा जिंकल्या आहे. 'आप'ने काँग्रेसला धक्का देत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले. गुजरातमध्ये सहा महापालिकांच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपला ५७६ पैकी ४८३ जागांवर विजय मिळाला असून, सुरतमध्ये १२० पैकी भाजपला ९३ जागा मिळाल्या. 

या पार्श्वभूमीवर केजरीवाल हे जनतेचे आभार मानण्यासाठी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेण्यासाठी आले होते. 'आप'ला यश मिळाल्याने भाजप आणि काँग्रेसवाले भयभीत झाल्याची टीका केजरीवाल यांनी केली. ते म्हणाले की, सुरतच्या निवडणूक निकालाने भाजप आणि काँग्रेसच्या प्रतिक्रियांचा आवाज क्षीण झाला आहे. ते दोन्ही पक्ष निकालाने धास्तावले आहेत. ते पक्षाला नसून, 'आप'ला मतदान करणाऱ्या जनतेला घाबरले आहेत. 

'आप'च्या विजयी नगरसेवकांची भेट घेतल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, मागील 25 वर्षांपासून सुरतमध्ये भाजपचे कशामुळे राज्य करत आहे? ते चांगले काम करत आहेत, म्हणून नव्हे तर त्यामागे अनेक गोष्टी आहेत. देशभरात विविध राज्यांत वेगवेगळे पक्ष सत्तेत येतात, मात्र इथे केवळ एकच पक्ष दिसतो. 'आप'च्या २७ नगरसेवकांपैकी एखाद्याला भाजपकडून फोन आला होता का? तुम्हाला फोन येईल आणि तशी योजनाही ते करत असतील. 

गुजरातमध्ये एकच पक्ष दिसण्याचे कारण आहे, त्यांनी अन्य पक्षांना नियंत्रणात ठेवले आहे. त्यांना बोलणारे कोणी नव्हते. त्यामुळे ते मनमानी कारभार करीत आहेत. पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार व्यक्ती आला आणि तुम्ही त्याचे जोरदार स्वागत केले. आमच्या नगरसेवकांना जनतेने विरोधी पक्षाची भूमिका दिली आहे. सभागृहात त्यांनी सत्ताधाऱ्यांना 'नानी'ची आठवण करून द्यावी. कोणतेही चुकीचे काम होऊ देऊ नका. आता भाजप कोणतेही चुकीचे काम करू शकणार नाही. कारण आता विरोधी पक्षात आम आदमी पक्ष बसला आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com