भगवंत मान हवाईसफरीमुळे अडचणीत ; जनतेच्या पैशांची उधळपट्टी भोवणार ?

राजकीय दौऱ्यासाठी भाड्याने घेतलेल्या खाजगी विमानाची 45 लाख रुपयांची बिले पंजाब नागरी हवाई वाहतूक विभागाला मिळाली आहेत.
Arvind Kejriwal, bhagwant mann
Arvind Kejriwal, bhagwant mannsarkarnama

अमृतसर : सत्तेत येण्यापूर्वी पंजाबचे मु्ख्यमंत्री भगवंत मान (bhagwant mann) तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबमध्ये हेलिकॉप्टर वापरल्यावरुन टीका करीत होते. मात्र, आता सत्तेवर आल्यावर मान दुसऱ्या राज्यात भेट देण्यासाठी खाजगी जेट भाड्याने घेत आहेत. यावरुन मान सरकारवर टीका होत आहे.

या वर्षाच्या अखेरीस गुजरात (gujarat) आणि हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुक होत आहे. यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आम आदमी पक्षाचे (aap) सुप्रीमो आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पक्षाच्या प्रचाराची सुरुवात करण्यासाठी गुजरातला भेट दिली होती.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या 1 ते 3 एप्रिल दरम्यान गुजरातच्या राजकीय दौऱ्यासाठी भाड्याने घेतलेल्या खाजगी विमानाची 45 लाख रुपयांची बिले पंजाब नागरी हवाई वाहतूक विभागाला मिळाली आहेत. त्यामुळे मान सरकार जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी करीत असल्याची टीका विरोधक करीत आहेत.

Arvind Kejriwal, bhagwant mann
जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका ? नवीन प्रभाग रचनेचा प्रश्न लवकर मार्गी लागणे अशक्यच

मान आणि केजरीवाल यांनी गुजरात दौऱ्यात साबरमती आश्रमाला भेट दिली होती. त्याचसोबत अहमदाबादमध्ये रोड शोही केला होता. गुजरात आणि हिमाचलमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न आप करीत आहे.

मान यांच्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यांवर खर्च केलेल्या रकमेबाबत आरटीआय कार्यकर्ते हरमिलाप सिंग ग्रेवाल यांनी तपशील मागितला होता. उत्तरात, पंजाब नागरी उड्डाण विभागाने खुलासा केला आहे की पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यासाठी भाड्याने घेतलेल्या विमानासाठी विभागाला 44,85,967 रुपयांची बिले प्राप्त झाली आहेत.

Arvind Kejriwal, bhagwant mann
ओवैसींचे राहुल गांधींना थेट आव्हान ; म्हणाले, नशीब अजमावून पाहा...

मुख्यमंत्री मान यांनी 6 एप्रिल रोजी राज्य सरकारच्या हेलिकॉप्टरमधून हिमाचल प्रदेशाचा दौराही केला होता. मात्र,हेलिकॉप्टरच्या वैयक्तिक भेटीवर किती खर्च झाला हे सांगता येत नाही, असे आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे.

सत्तेत येण्यापूर्वी मान तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबमध्ये हेलिकॉप्टर वापरल्याबद्दल टर उडवित होते. मात्र,आता सत्तेवर आल्यावर मान दुसºया राज्यात भेट देण्यासाठी खाजगी जेट भाड्याने घेत आहेत, अशी टीका ग्रेवाल यांनी केली आहे.

"मान यांचा गुजरात आणि हिमाचलचा दौरा निव्वळ पक्षाच्या प्रचारासाठी होता. राज्य सरकारच्या कामकाजाशी किंवा पंजाबच्या फायद्यासाठी त्यांचा काहीही संबंध नव्हता," असे ग्रेवाल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com