दिल्लीत 'आप' सरकार कायम; विश्वासदर्शक ठराव जिंकला...

AAP : भाजपला एकही मत मिळालं नाही...
Cm Arvind Kejriwal-Pm Narendera Modi News, Dehli
Cm Arvind Kejriwal-Pm Narendera Modi News, DehliSarkarnama

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने (AAP) विधानसभेत बहुमत प्रस्ताव जिंकला आहे. या प्रस्तावाच्या बाजुने 58 मते पडली असून विरोधात एकही मत पडलं नाही. हा बहुमत प्रस्ताव जिंकल्यावर भाजपचे (BJP) 'ऑपरेशन लोटस' अपयशी ठरल्याची टीका केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना केली आहे. (Cm Arvind Kejriwal-Pm Narendera Modi News, Dehli)

Cm Arvind Kejriwal-Pm Narendera Modi News, Dehli
एकटा नाथाभाऊ विरोधकांना पुरून उरलाय...

केजरीवाल म्हणाले, भाजपची देशातील 8 ते 10 विरोधी सरकारांवर नजर असून या सरकारांमधील आमदारांना वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मात्र दिल्लीतही अशा आॅफर्स देण्याचा प्रकार झाला होता. मात्र ते आमचा एकाही आमदाराला खरेदी करु शकले नाही. आमच्या बाजुने 58 मते पडली असून भाजपच्या बाजूला एकही मतं पडलं नाही, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.

उपसभापतींसोबत झालेल्या वादानंतर भाजपच्या पाच आमदारांनी त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांना सभागृहातून बाहेर काढल्यानंतर त्यांनीही सभात्याग केला. यामुळे त्यांच्या बाजूने एकही मत पडलं नाही. सभागृहात उपस्थित असलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) सर्व आमदारांनी अपेक्षेप्रमाणे प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. यामुळे आपने सहज विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला आहे.

Cm Arvind Kejriwal-Pm Narendera Modi News, Dehli
'ये मीठा है, ओ कडू है', बच्चू कडूंबद्दल सत्तार असे का म्हणाले, करावं लागल स्पष्ट

भाजप आमदार - विजेंदर गुप्ता, अभय वर्मा आणि मोहन सिंग बिश्त यांचा उपसभापती राखी बिर्ला यांच्याशी वाद केल्यामुळे त्यांना मार्शल आउट करण्यात आले. त्यामुळे बाकीच्या आमदारांनीही सभागृहातून बाहेर पडले होते.

दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांचे केजरीवाल यांनी जोरदार समर्थन केलं. त्यांनी भ्रष्टाचार केला असता तर त्यांच्या घरी पैसा सापडला असता. सीबीआयने छापेमारी करुनही त्यांना काहीच सापडलेले नाही. भाजपने शिसोदियांना बदनाम करण्यासाठी तपास यंत्रणाचा गैरवापर केला आहे. भाजपने आमदारांना खरेदी करण्याची पध्दत बंद करावी, अशी आमची मागणीअसून पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करा याबरोबरच शेतकरी, विद्यार्थ्यांचे कर्ज कमी केले जावे, अशा मागण्याही केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in