राज्याच्या राजकारणात 'आप'चे वादळ घोंगावणार : २ माजी खासदार अन् एक बडा नेता गळाला?

AAP | Maharashtra : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-मनसे असा संघर्षांचा फायदा उचलण्याचा आपचा प्रयत्न
राज्याच्या राजकारणात 'आप'चे वादळ घोंगावणार : २ माजी खासदार अन् एक बडा नेता गळाला?
Arvind Kejriwal Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात एका बाजूला सातत्याने महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विरुद्ध भाजप-मनसे (BJP-MNS) असा संघर्ष सुरु असतानाच इथल्या राजकारणात आता आम आदमी पक्षाची (Aam Aadmi Party) एन्ट्री होणार आहे. दिल्ली (Delhi) आणि पंजाबमधील (Punjab) यशानंतर 'आप'ने २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राज्यात पक्ष विस्ताराचे धोरण अवलंबिले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून मुंबईतील काँग्रेसचे दोन माजी खासदार आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता आम आदमी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal
संदिप देशपांडेच्या अडचणीत वाढ; पोलिसांसमोर पळून जाणे महागात पडणार!

मात्र हे पक्ष प्रवेश तात्काळ होणार नसून हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकांनंतर होण्याची शक्यता आहे. इकोनॉमिक्स टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय आपण या नेत्यांना स्वतःहुन संपर्क केला नसून आपल्यालाच या नेत्यांनी संपर्क केला असल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आणि मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या, केवळ काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत्यांनी देखील आपशी संपर्क केला आहे. याशिवाय कॉंग्रेसचे काही माजी मंत्री आपच्या संपर्कात असून त्यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. ते आमच्या पक्षाला काय योगदान देणार यावर एक प्रदिर्घ चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.