Aditya Thackeray News : बिहारमध्ये आदित्य ठाकरेंचे दणक्यात स्वागत

Aditya Thackeray News : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

Aditya Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज बिहारचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार आहेत.

आदित्य ठाकरे यांचे पटणा येथील विमानतळावर शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. फुलांची उधळण करत, फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी उत्साहात आदित्य यांचे स्वागत केले. आदित्य यांच्यासोबत शिवसेनेच्या (Shivsena) खासदार प्रियंका चतुर्वेदी, त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई (Anil Desai), प्रियंका चतुर्वेदी हे नेतेही उपस्थित आहेत.

Aditya Thackeray
Shivsena : चाळीस गावं काय ? ४० इंच जमीन देखील कर्नाटकला घेता येणार नाही..

आदित्य ठाकरे, तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. येथे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. आदित्य आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीमागे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा संदर्भ असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर भारतीय मतांची मोठी संख्या मुंबईमध्ये आहे. शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक भाजपनेही प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडूनही या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येत आहे.

Aditya Thackeray
Aurangabad : तुपकरांसह शेतकरी मुंबईच्या दिशेने ; सिल्लोडजवळ शेतात खाल्ली दुपारची भाकर..

त्याच पार्श्वभूमिवर आदित्य यांची ही बिहार भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तेजस्वी यादव यांनी भाजपच्या विरोधात थेट भूमिका घेतली आहे. त्यातच महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर ठाकरेही भाजपच्या विरोधात ठामपणे उभे ठाकले आहेत. त्यामुळे भाजप विरोधकांना एकत्र करण्यासाठीही ही भेट महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in