अविवाहित आमदाराचं नाव गाडीच्या नंबरप्लेटवर लिहित तरूण म्हणतोय, मी त्यांचा नातू!

राजकीय नेतेमंडळी कोणत्या कारणाने चर्चेत येतील हे सांगता येणार नाही. तमिळनाडूतील भाजपचे आमदार भलत्याच कारणाने चर्चेत आले आहेत.
'Grandson of Nagercoil MLA Shri MR Gandhi' written on the number plate.
'Grandson of Nagercoil MLA Shri MR Gandhi' written on the number plate.Sarkarnama

चेन्नई : राजकीय नेतेमंडळी कोणत्या कारणाने चर्चेत येतील हे सांगता येणार नाही. तमिळनाडूतील भाजपचे (BJP) आमदार भलत्याच कारणाने चर्चेत आले आहेत. अविवाहित असलेल्या या आमदारांचं नाव गाडीच्या नंबरप्लेटवर लिहित एक तरूण आपण त्यांचा नातू असल्याचे सांगत फिरत आहे. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या या आमदारांचा अचानक नातू प्रकट झाल्याने सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली आहे. या तरूणाचा गाडीवर बसलेला फोटोही तूफान व्हायरल होत आहे. (Political News)

तमिळनाडूतील (Tamil Nadu) नागरकोईल मतदारसंघाचे भाजप आमदार एम. आर. गांधी (M. R. Gandhi) यांच्याबाबतीत हा प्रकार समोर आला आहे. 'नागरकोईल एमएलए एम. आर. गांधी यांचा नातू' असं एका तरूणाने दुचाकीच्या समोरील नंबरप्लेटवर लिहिलं आहे. ही दुचाकी घेऊन तो फिरत असतो. याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ('Grandson of Nagercoil MLA Shri MR Gandhi' written on the number plate)

'Grandson of Nagercoil MLA Shri MR Gandhi' written on the number plate.
IPS त्रिपाठींची कुंडली बाहेर येणार; पोलिसांच्या पाच पथकांनी आवळला फास

आमदार गांधी हे 76 वर्षांचे असून ते अविवाहित आहेत. ते 1980 पासून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. पण सहावेळा त्यांचा पराभव झाला. अखेर 2021 मध्ये भाजपच्या तिकीटावर ते विजयी झाले. पहिल्यांदाच आमदार झालेले गांधी त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी लग्नही केलेले नाही. पायात चप्पल न घालता ते विधानसभेत जातात त्यामुळे त्यांच्याबाबत लोकांच्या मनात खूप आदर आहे.

कोण आहे हा तरूण?

तरूणाच्या नंबरप्लेटचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. या तरूणाने गाडीवर असं का लिहिलं, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. पण नंतर भाजपकडूनच याचा खूलासा करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून कन्नन नावाचा व्यक्ती गांधी यांच्या गाडीचा चालक आहे. गांधी हे आमदार झाल्यानंतरही कन्नन आणि त्याचे कुटुंब त्यांच्यासोबतच आहेत. आमदारकी पदरात पडल्यानंतर कन्नन गांधींच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक बनला आहे. हा तरूण कन्नन यांचाच मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे नाव अमरीश आहे.

अमरीश हा गांधी यांचा खूप आदर करतो. त्यामुळे त्यानंतर असं लिहिलं असावं, असं सांगितलं जात आहे. भाजप कार्यकर्त्यांनीही असाच दावा केला आहे. पण नंबरप्लेटवर असं नाव लिहून फिरण्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियातही अनेक मीम्स करण्यात आले आहेत. अशाप्रकारे नियमांचं उल्लंघन करणे, चुकीचे असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in