
Karnataka Political Struggle : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले. परंतु मात्र मागील चार पाच दिवसांपासून सत्तास्थापनेचा काँग्रेसचा (Congress) तिढा वाढतच होता. अखेर सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांना मुख्यमंत्री तर डि के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री पद असे सत्तास्थापनेचे सूत्र मान्य झाल्यानंतर, अखेर काँग्रेसपुढील तिढा सुटला. मात्र आता सत्तास्थापनेच्या तिढा सुटतो न सुटतो आता काँग्रेसमध्ये अजून एक नाट्याला सुरूवात झाली आहे.
२० मे रोजी सिद्धरमय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. शपथविधीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध विरोधीपक्षांना आणि नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रितांची यादीच काँग्रेसने जाहीर केली आहे. मात्र एक विशेष गोष्ट म्हणजे, या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह अनेकांची नावे नाहीत. निमंत्रितांच्या यादीत बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव याचे नावांचा समावेश आहे.
सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री -
सिद्धारामय्या यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. ते काँग्रेसचे कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते आहेत. उच्चशिक्षित असून त्यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. सिद्धारामय्या हे धनगर समाजातील आहेत. कर्नाटका (Karnataka) त धनगर समाज मोठ्या प्रमाणावर असून या वर्गावर सिद्धारामय्या यांचा मोठा प्रभाव आहे.
आताही त्यांनी कर्नाटकात काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच काँग्रेस हायकमांडनं त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी सिद्धारामय्या यांनी 2013 ते 2018 या कालावधीत कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.