मुख्यमंत्र्याच्या सुरक्षेत मोठी चूक अज्ञाताकडून हल्ला करण्याचा प्रयत्न

Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा तेलंगणा दौऱ्यावर आहेत.
Chief Minister Himanta Biswa Sarma
Chief Minister Himanta Biswa Sarma Sarkarnama

Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. हैदराबाद येथे एका सभेत एका व्यक्तीने अचानक स्टेजवर चढून स्टेजवरील माईक तोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांशी झटापट करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने सरमापासून दूर नेले. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

मुख्यमंत्री सरमा यांच्या भेटीदरम्यान टीआरएस कार्यकर्त्यांनीही गोंधळ घातला होता. व्यासपीठावरील व्यक्ती 'टीआएस'शी संबंधित असू शकते, असा दावाही केला जात आहे. (Himanta Biswa Sarma on Attack News)

तत्पूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हैदराबाद येथील महालक्ष्मी मंदिराला भेट दिली होती. येथून बाहेर पडल्यानंतर ते म्हणाले की, सरकार हे केवळ देश आणि जनतेसाठी असले पाहिजे. सरकार कधीही कुटुंबासाठी नसावे. देशात उदारमतवाद आणि मूलतत्त्ववाद आहे आणि या दोघांमध्ये देशात नेहमीच ध्रुवीकरण होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, केसीआर भाजपमुक्त भारताची भाषा करतात. त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. त्यांना भाजपला संपवायचे आहे. आम्हाला भारतीय राजकीय व्यवस्थेतून कौटुंबिक राजकारण संपवायचे आहे. दरम्यान सरमा यांच्यावर होणारा हल्ला लोकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in