भाजप खासदाराच्या 'त्या' वक्तव्यावर पक्षात प्रचंड नाराजी; जे.पी नड्डांनी मागितलं स्पष्टीकरण

J.P. Nadda : जे.पी. नड्डा यांनी भाषणाची ध्वनिचित्रफीत मागून घेतली आहे.
Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest News
Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest Newssarkarnama

नवी दिल्ली : भाजपचे (BJP) पश्चिम दिल्लीचे खासदार प्रवेश वर्मा यांना मुसलमानांवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाची टिप्पणी भोगण्याची चिन्हे आहेत. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी वर्मा यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत मागून घेतली आहे. त्यांच्याकडून सदर वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. वर्मा यांनी मात्र आपल्याकडे पक्षाने अजून कोणतीही विचारणा केलेली नाही,असा दावा केला आहे. (Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest News)

Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest News
कॉंग्रेसाध्यक्ष निवडणूक : पिंपरीचे शंभर टक्के मतदान..एका मतदाराने केलं आसामध्ये मतदान

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेबसिंग वर्मा यांचे पुत्र असलेले खासदार प्रवेश हे यापूर्वीही वादग्रस्त टिप्पणी केल्याने चर्चेत आले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान ते व केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी मुस्लिम समाजाबद्दल प्रक्षोभक विधाने केली होती. योगायोग असा की हे दोघेही भाजपमधील घराणेशाहीचे प्रतिनिधीत्व करतात. हे दोघे त्याचप्रमाणे साध्वी निरंजन ज्योति, साध्वी प्रज्ञा ठाकुर, भाजप युवा मोर्चाचे प्रमुख खासदार तेजस्वी सुर्या यांच्यासारखे टीम मोदीमधील अनेक खासदार व मंत्री प्रक्षोभक विधाने करत असतात. मात्र त्याच्या वेळी एक तर त्यांना तंबी देऊन सोडून दिले जाते किंवा काहीही कारवाई केली जात नाही, असा पूर्वानुभव आहे.

Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest News
राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र म्हणजे मॅच फिक्स होती...

प्रेषित पैगंबर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केल्यापासून मात्र भाजप नेते सावध झाले आहेत. आता खासदार वर्मा यांच्यावरही भाजप नेतृत्व प्रतिकात्मक का होईना पण कारवाई करण्याची चिन्हे आहेत. खासदार वर्मा यांच्या टिप्पणीने भाजपाध्यक्ष प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे मुस्लिम समाजाला भाजपचा जवळ आणण्याबाबत, असे आवाहन करीत असताना खासदार वर्मा यांच्यासारख्या नेत्यांनी मुसलमान समाजावर बहिष्कार टाकावा,असे आवाहन करणे, भाजपला परवडणारे नाही, असे सांगितले जाते. मात्र भाजप नेत्यांच्या एका गटाच्या मते दिल्ली महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असल्याने खासदार वर्मा यांच्यावर तातडीने कठोर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. नुपुर शर्मा यांच्या वेळेसारखे, वर्मा यांच्या वक्तव्याचे भारताबाहेर पडसाद उमटलेले नाहीत, त्याचप्रमाणे वर्मा यांनी कोणत्याही समाजाचा थेट नामोल्लेख केला नाही, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest News
काॅंग्रेसचे निमंत्रण, पण ठाकरे-पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का ?

विश्व हिंदू परिषद व संघ परिवारातील संघटनांच्यावतीने दिल्लीत विराट हिंदू सभा' नुकतीच झाली तीच खासदार वर्मा यांनी हिंदू मुलींवर हल्ले करणार्‍या, त्यांना फसवणाऱ्या समाजावर' पूर्ण बहिष्कार" टाकण्याचे आवाहन केल्याचा आरोप आहे. वर्मा यांनी मुसलमान समाज असे म्हटले नसले तरी त्यांचा रोख तोच होता आणि त्यामुळे समाजात वेगळा, प्रतिकूल संदेश जातो असे भाजप नेत्यांचे मत आहे. कोणत्याही समाजात बदल आणि त्यांच्या प्रेषितांबद्दल जाहीर वक्तव्ये करू नका, अशी तंबी भाजप नेते आणि प्रवक्ते यांना यापूर्वीच देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com