पंजाबमध्ये शिवसेनेच्या मोर्चात तुफान राडा; तलवारी घेऊन दोन गट भिडल्याने तणावाची स्थिती

पातियाळा शहरात शुक्रवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन गडांमध्ये तुफान राडा झाला असून तलवारी घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे.
पंजाबमध्ये शिवसेनेच्या मोर्चात तुफान राडा; तलवारी घेऊन दोन गट भिडल्याने तणावाची स्थिती
Clash between two groups in Patiala, PunjabSarkarnama

चंडीगड : पंजाबमधील (Punjab) पातियाळा शहरात शुक्रवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन गटांमध्ये तुफान राडा झाला असून तलवारी घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे. तसेच दोन्ही बाजूने दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. शहरातील काली माता मंदिराजवळ ही घटना घडली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असूनही दोन घट भिडले होते.

शिवसेनेकडून (Shiv Sena) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पंजाब शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला (Harish Singla) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. पण या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. हा मोर्चा खलिस्तानविरोधी असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर काही शीख संघटनांनी या मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

Clash between two groups in Patiala, Punjab
राज ठाकरेंच्या ताफ्यात गुजरातची गाडी? गाडीत कोण होतं?

पोलीस उपअधिक्षक मोहित मल्होत्रा यांनी सांगितले की, शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही शिवसेनेचे प्रमुख हरीश सिंगला यांच्याशी बोलत आहोत. त्यांच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नव्हती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ही घटना दुर्देवी असून सरकार राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करेल, असं मान यांनी म्हटलं आहे.

मान यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 'पातियाळामध्ये दोन गटांत झालेला वाद दुर्देवी आहे. मी पोलीस महासंचालकांशी बोललो आहे. घटनेच्या ठिकाणी सध्या शांतता आहे. आम्ही परिस्थितीचा सतत आढावा घेत आहोत. अशांतता पसरवणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. पंजाबमधील शांतता आणि एकोपा हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे,' असं मान यांनी सांगितले.

पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली असून काही अफवांमुळे स्थानिक स्थिती बिघडली होती. या घटनेत जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांरकडून मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण पोलिसांनी ही परवानगी नाकरली होती, असं तपासात समोर आले आहे. या घटनेटे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.