BJP : उद्योजकाच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या माजी मंत्र्यावर गुन्हा दाखल

BJP News : सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
BJP Latest News
BJP Latest NewsSarkarnama

बंगळूर : उद्योगपती प्रदीप यांच्या आत्महत्येप्रकरणी माजी मंत्री व भाजप (BJP) आमदार अरविंद लिंबावली (Arvind Limbavali) यांच्यासह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

उद्योगपती प्रदीप (वय ४७) यांचा रविवारी संध्याकाळी बंगळूर दक्षिण तालुक्‍यातील नेट्टीगेरेजवळ त्याच्या रिसॉर्टमध्ये डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.प्रदीपच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कग्गलीपुर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले की, कायद्यानुसार कारवाई केली जाईल. कायद्यानुसार तपास होत असल्याने सरकारने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निःपक्षपातीपणे तपास केला जाईल आणि जो कोणी सहभागी असेल, त्याला कायद्यानुसार शिक्षा केली जाईल, असे ते म्हणाले.

BJP Latest News
Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदच्या अडचणी वाढणार? पुण्यात तक्रार दाखल

प्रदीपसह गोपी, सोमय्या आणि इतरांनी एचएसआर लेआउटजवळ रिसॉर्ट बांधण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले. गुंतवणूक केली आणि नंतर त्याचा हिस्सा दिला गेला नाही. त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी केली.

BJP Latest News
Bjp : फडणवीसांना ताप, पण पत्रिकेवर नाव नसूनही पंकजा मुंडे सभेला हजर..

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी शनिवारी रात्री कुटुंबासह नेट्टीगेर रिसॉर्टमध्ये गेलेल्या प्रदीपने रविवारी सकाळी रिसॉर्ट सोडून शिरा येथे जाण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, शिरा येथे जाण्याऐवजी त्याने रिसॉर्टमध्ये मृत्यूची नोट लिहिली आणि डोक्यात गोळी झाडून घेऊन त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com