Delhi Politics : राजकारण तापलं! दिल्लीत ‘मोदी हटाओ देश बचाओ’ बॅनरबाजी; 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Delhi Political news | संपूर्ण दिल्ली शहरातून सुमारे 2000 पोस्टर्स हटवण्यात आले.
Delhi Politics :
Delhi Politics :Sarkarnama

Poster In Delhi : राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीत जागोजागी ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असे पोस्टर दिसू लागले आहे. त्यातच सोशल मिडीयावर देखील हे फोट व्हायरल होऊ लागल्याने हे पोस्टर्स कोणी लावले अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 100 गु नोंदवले आहेत. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, संपूर्ण शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावर वेगाने कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पोस्टर्समध्ये प्रिंटिंग प्रेसची कोणतीही माहितीही देण्यात आलेली नाही.

Delhi Politics :
Gudi Padwa : राजकीय नेत्यांकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा! पाहा खास फोटो

या प्रकऱणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर या पोस्टर्सची लिंक आम आदमी पार्टीशी संबंधित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर पडल्यावर पोलिसांनी ही व्हॅनमधून त्यांनी अनेक पोस्टर्स जप्त केल्याचेही सांगितले. या प्रकरणी काहींना घटनास्थळी अटकही करण्यात आली. तसेच प्रिंटिंग प्रेस कायदा आणि मालमत्ता कायद्याचा गैरवापर या कलमांतर्गत गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

Delhi Politics :
Nitish Kumar : मुख्यमंत्र्यांना गुजरातमधून जीवे मारण्याची धमकी ; दोन राज्यातील पोलीस अलर्ट

सीपी दीपेंद्र पाठक म्हणाले की, संपूर्ण दिल्ली शहरातून सुमारे 2000 पोस्टर्स हटवण्यात आले. तर दोन प्रिंटिंग प्रेस कंपन्यांना प्रत्येकी पन्नास हजार पोस्टर्स बनवण्याचे काम देण्यात आले होते. कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी रविवारी आणि सोमवारी हे पोस्टर्स बनवले होते. हे पोस्टर्स दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात पोस्टर्स लावले. पोस्टरवर छापखान्याचे नाव न छापल्याने मालकांना अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com