गुजरातमध्ये पूल कोसळून 140 जणांचा मृत्यू ; आकडा वाढण्याची शक्यता

Morbi Bridge Collapse मच्छू नदीवरील हा पूल तब्बल 140 वर्ष जुना आहे. गुजरातच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी हा पूल एक आहे.
Morbi Bridge Collapse
Morbi Bridge Collapse

Gujarat Morbi Bridge Collapse : गुजरातच्या मोरबी (Morbi News) जिल्ह्यात एक झुलता पूल (Morbi Bridge Collapse) कोसळून 140 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर नदीत पडलेल्या लोकांचा शोध सुरु असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती गुजरात सरकारकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मोरबीमध्ये काल सायंकाळी मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. यावेळी पूलावर असलेले 400 हून अधिक लोक नदीत कोसळले. या दुर्घटनेत 140 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जण जखमी झाले. दुर्घटनेनंतर बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

Morbi Bridge Collapse
Akola Crime News| अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांची हत्या

महत्त्वाची बाब म्हणजे पाच दिवसांपुर्वीच या पूलाची दुरुस्त करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटनही करण्यात आले होते. पण पाच दिवसातच पूल कोसळल्यामुळे आता पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. घटनेनंतर पुलाची देखभालदुरुस्ती करणाऱ्या कंपनींवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीचीही स्थापना करण्यात आली आहे. तर दुसरीकडे 100 जणांची क्षमता असलेल्या पुलावर दुर्घटना झाली त्यावेली जवळपास 400 जण उपस्थित असल्याची माहितीही समोर आली आहे.

1880 मध्ये या पुलाचं बांधकाम कऱण्यात आले होते. त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांनी या पूलाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी हा पूल बनवण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करण्यात आला. या पुलाच्या बांधकामाचं सर्व साहित्य ब्रिटनमधून आयत करण्यात आलं होतं. बांधकामानंतर कालपर्यंत अनेकवेळा या पूलाची डागडुजी करण्यात आली. या पुलाची लांबी 765 फूट आणि 1.25 मीटर रुंद आणि 230 मीटर लांब होता. हा पूल भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाही साक्षीदार आहे. हा भारतातील सर्वात जुन्या पुलांपैकी एक असल्यामुळे तो पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र होता.

दरम्यान, मच्छू नदीवरील हा पूल तब्बल 140 वर्ष जुना आहे. गुजरातच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी हा पूल एक आहे. याठिकाणी दररोज शेकडो लोक येत असतात. या पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा झुलता पूल आहे. पण काल सायंकाळी इथे मोठ्या संख्येनं लोक आले होते. 100 जणांची क्षमता असलेल्या या पुलावर अचानक पाचशे-सहाशे लोक एकत्र जमल्याने पुलाला हा भार सहन झाला नाही आणि पूल कोसळून नदीत पडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in