राज्यसभेतून 72 सदस्य निवृत्त : पहिल्यांदाच इतका मोठा निरोप समारंभ, मोदीही हजर

राज्यसभेतून (Rajya Sabha) जुलैपर्यंत निवृत्त होणाऱ्या 72 सर्वपक्षीय सदस्यांचा निरोप समारंभ आज पार पडला.
राज्यसभेतून 72 सदस्य निवृत्त : पहिल्यांदाच इतका मोठा निरोप समारंभ, मोदीही हजर
Narendra Modi, Mallikarjun Kharge, Piyush Goyalsarkarnama

नवी दिल्ली : राज्यसभेतून (Rajya Sabha) निवृत्त होणाऱ्या अनुभवसंपन्न खासदारांनी आपले अनुभव पुढील पिढ्यांसाठी शब्दबद्ध करावेत अशी, अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (ता.३१) व्यक्त केली. निवृत्तांच्या अनुभवांमध्ये जे श्रेष्ठ आहे ते देशाच्या समृद्धीसाठी पुढे नेऊ असा संकल्प वर्तमान सदस्यांनी सोडावा. संसदेच्या चार भिंतींमधून आपण सर्वजण बाहेर पडला तर येथील अनुभव चारही दिशांना द्याल, अशी आशा मला आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये देण्याची पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देण्याची जबाबदारी निवृत्त सदस्यांवर असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

राज्यसभेतून जुलैपर्यंत निवृत्त होणाऱ्या 72 सर्वपक्षीय सदस्यांचा निरोप समारंभ आज पार पडला. भावपूर्ण वातावरणात झालेल्या या निरोप समारंभात पंतप्रधान मोदी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), सभागृहनेते पियुष गोयल (Piyush Goyal), आनंद शर्मा (Anand Sharma), जयराम रमेश (Jairam Ramesh) आदींनी आपले विचार मांडले. इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी सदस्यांना निरोप देण्याची वेळ कित्येक वर्षांत राज्यसभेत आली नव्हती, असे रामगोपाल यादव व तिरूची शिवा यांच्यासह अनेकांनी सांगितले. मात्र, खर्गेंच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाबाहेर पडताच भाजपचे अनेक बाकही रिकामे झाले.

Narendra Modi, Mallikarjun Kharge, Piyush Goyal
राहुल गांधींनी मोदींना पाकिस्तान दाखवताच भाजप नेत्यानं थेट महाराष्ट्र दाखवला!

लोकशाहीत संख्येने कमी असले तरी तर्क आणि विचारांमध्ये विरोधक श्रेष्ठ असतात. मात्र, लोकशाहीत आज-काल तर्कांपेक्षा संख्येला महत्त्व आले आहे, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वाक्य उच्चारत खर्गे यांनी मोदी सरकारला टोला लगावला. पंतप्रधान आज राज्यसभेत आले हे आमचे भाग्य, असा चिमटा काढून खर्गे म्हणाले की हाऊसफुल सभागृह मी प्रथमच पहात आहे. वरिष्ठ सभागृह हे कल्पनाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या विचारांचे भांडार आहे. कोणत्याही राजकीय नेत्याला राज्यसभेत राहिल्या विना कोणत्याही राजकीय नेत्याचे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकत नाही, असे पंडित नेहरू यांनी सांगितले होत, असेही खर्गे म्हणाले.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये डॉ विनय सहस्रबुद्धे, जयराम रमेश, डॉ नरेंद्र जाधव यांच्यासह नऊ खासदार हे विविध संसदीय समित्यांचे अध्यक्ष आहेत. निवृत्तांमध्ये सभागृहनेते पियुष गोयल, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. मंत्री मुक्तार अब्बास नकवी, ज्येष्ठ नेते ए के अँटनी, अंबिका सोनी, पी चिदंबरम, सुरेश प्रभू, आनंद शर्मा, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत (Sanjay Raut), नरेश गुजराल, रामगोपाल यादव, सतीश मिश्रा आदींचा समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी याबाबतची आकडेवारी देऊन, यातील अनेक सदस्य जेव्हा सभागृहात अभ्यास करून बोलतात, तेव्हा मलाही समाधान वाटते अशी, भावना व्यक्त केली. प्रसारमाध्यमे सध्याच्या काळात रचनात्मक संसदीय कामकाज दाखवत नाहीत व गोंधळ हीच बातमी होते, असेही नायडू म्हणाले. भविष्यात माध्यमांनी जबाबदारीने वर्तणूक करावी, अशी आशाही नायडू यांनी व्यक्त केली.

उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितले की भारताची एकता आणि विविधता यांचे प्रतिनिधित्व हे सभागृह करते. निवृत्त सदस्यांच्या अनुभवांवर आधारित पुस्तक राज्यसभा सचिवालयाने प्रसिद्ध करावे, त्याचप्रमाणे दर दोन वर्षांनी येणाऱ्या नव्या खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्त सदस्यांना आमंत्रित करावे, अशाही अशीही कल्पना त्यांनी मांडली.

Narendra Modi, Mallikarjun Kharge, Piyush Goyal
नितीश कुमारांची इच्छापूर्ती? बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री अन् JD(U) चे २ उपमुख्यमंत्री

कोण काय म्हणाले?

तिरूची शिवा-राज्ये म्हणाले, भाषा, चालीरीती यांच्या भिंती राज्यसभेतच गळून पडतात. डेरेक ओब्रायन म्हणाले, की मी अशा सभागृहात राहिलो की जेथे एक नव्हे तर दोन माजी पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान होते, असे मी माझ्या नातवंडांना सांगेन. लोकशाहीत बहुमताने अल्पमतात चे महत्व ओळखून त्याला मान दिला पाहिजे, असे प्रसन्न आचार्य यांनी सांगितले.

रामगोपाल यादव म्हणाले, 72 सदस्यांच्या निवृत्तीनंतर राज्यसभेची संपन्नता कायम राहील याची जबाबदारी सत्तारूढ पक्षाकडे जाते. इतक्या मोठ्या संख्येने अनुभवी सदस्य राज्यसभेतून निवृत्त होणे हे वेदनादायी आहे. निवृत्त सदस्यांना पुन्हा येथे येण्याच्या शुभेच्छा देते, असे वंदना चव्हाण म्हणाल्या.

सदस्यांनी आपल्या ज्ञानाने राज्यसभा आणि देशाच्या प्रतिष्ठित भर घातली आहे त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाला या पुढे हि मिळत राहील, यासाठी काम करावे, असे अनिल देसाई म्हणाले. मनोज झा यांनी सांगितले की निवृत्त होणाऱ्या प्रत्येकाकडून काहीना काही मौल्यवान विचार या सभागृहाला आणि प्रत्येक सदस्याला मिळाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in