नितीशकुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळातील ७० टक्के मंत्री कलंकित तर १७ जणांवर आहेत गंभीर गुन्हे

Nitishkumar| सर्व मंत्र्यांची सरासरी मालमत्ता ६ कोटींच्या आसपास आहे.
Nitish Kumar, tejashwi Yadav Latest News
Nitish Kumar, tejashwi Yadav Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : बिहारमधील नितीशकुमार (Nitishkumar) यांच्या नव्या आघाडी सरकारमधील ७० टक्के मंत्री कलंकित असल्याचे एडीआरच्या (ADR) अहवालात म्हटले आहे. १७ मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्यावर खटले सुरू असल्याचे नमुद केले आहे. (Nitish Kumar, Bihar Latest News)

Nitish Kumar, tejashwi Yadav Latest News
पंतप्रधान मोदींच्या कथनी अन् करणीत फरक; बिल्कीस बानो प्रकरणावरून काँग्रेसचा घणाघात

बिहारच्या नवीन सरकारमधील कायदा मंत्री कार्तिकेय सिंह यांचे नाव एका अपहरण प्रकरणात आल्यानंतर बिहारचे राजकारण तापले आहे. यादरम्यान निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी काम करणाऱ्या एडीआर संस्थेचा हवाल समोर आला आहे. यात ७० टक्के मंत्र्यांवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जेडीयू (JDU) आणि राजद आघाडी सरकारमधील एकूण २३ मंत्र्यांवर गुन्हे दाखल असून त्यापैकी १७ जणांवर गंभीर स्वरुपाचे खटले दाखल आहेत. एडीआरचा अहवाल हा विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीदरम्यान आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्राच्या आधारावर केला आहे.

Nitish Kumar, tejashwi Yadav Latest News
केंद्रातील राजकारणात फडणविसांचे पहिले पाऊल : लोकसभेसाठी पुण्यातून चाचपणी

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री जेडीयूचे अशोक चौधरी यांचे नाव विधान परिषदेसाठी सूचविण्यात आले असून त्यांना शपथपत्र दाखल करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी पाश्‍र्वभूमी, आर्थिक आणि अन्य बाबींचे विवरण उपलब्ध होऊ शकले नाही, असे एडीआरने म्हटले आहे.

नितीशकुमार यांचे कॅबिनेट

  • बिहार सरकारमधील ३२ पैकी २७ मंत्री कोट्यधीश

  • सर्व मंत्र्यांची सरासरी मालमत्ता ६ कोटींच्या आसपास

  • समीर कुमार महासेठ यांच्याकडे सर्वाधिक २४.४५ कोटींची मालमत्ता

  • मुरली प्रसाद गौतम यांच्याकडे सर्वात कमी १७.६६ लाखांची मालमत्ता

  • आठ मंत्र्यांचे शिक्षण ८ वी ते १२ इयत्तेदरम्यान

  • १७ मंत्र्यांचे वय ३० ते ५० दरम्यान

  • १५ मंत्र्यांचे वय ५१ ते ७५ वयोगटादरम्यान

कलंकित मंत्र्यांत सुरेंद्र यादव आघाडीवर

जेडीयू-राजद सरकारमध्ये सामील झालेल्या कलंकित मंत्र्यांचा उल्लेख केल्यास राजदचे सुरेंद्र यादव आघाडीवर आहेत. त्यांच्यावर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. जमा खान यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. मदन सहनी यांच्यावर दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com