Himachal Election : हिमाचलमध्ये सत्ता बदलणार की प्रथा? 412 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

Himachal Election News : हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी आज मतदान झाले.
Himachal Election
Himachal Electionsarkarnama

Himachal Election News : हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी आज मतदान झाले. मात्र, या निवडणुकीत 2017 च्या तुलनेत मतदानाचा आकडा घटलेला दिसत आहे. राज्यात पाचवाजेपर्यंत 66 टक्के मतदान झाले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात 74.6 टक्के मतदान झाले होते. हिमाचलच्या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहिर होणार आहे.

हिमाचल प्रदेशात बहुमतासाठी 35 जागांची गरज असते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 44 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सत्ताधारी भाजपने (BJP) विकासासाठी 'सातत्य' आवश्यक असल्याचा आग्रह धरला आहे. 'डबल इंजिन' म्हणजेच राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे कामात व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेईल, असा प्रचार भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

Himachal Election
रविंद्र जाडेजासमोर धर्मसंकट; बायको भाजपची उमेदवार अन् बहीण काँग्रेसची प्रचारक

दुसरीकडे काँग्रेसचे (Congress) म्हणणे आहे की, निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर आहे. सत्ताधारी पक्षाला मतदान न करण्याच्या चार दशकांच्या परंपरेची या वेळीही पुनरावृत्ती होईल, अशी पक्षाला आशा आहे. वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर पक्ष नेतृत्व संकटात सापडले आहे. पक्षाचे म्हणणे आहे की ते सत्तेत परत येतील कारण त्यांचे जागानिहाय तिकीट वाटप 'पूर्वीपेक्षा चांगले' होते.

दरम्यान, राज्यात 5 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान झाले, असले तरी या आकड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होऊ शकते. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा घटल्याचे दिसत आहे. मात्र, अजून पूर्ण आकडेवारी समोर आलेली नाही.

Himachal Election
केंद्रीय मंत्र्यांनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद अन्‌ पैसेही दिले...!

जगातील सर्वात उंचीवर असलेल्या ताशीगांग मतदान केंद्रावर लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसला. येथे एकूण 52 मतदारांपैकी 51 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ताशीगांगमध्ये 98.08 टक्के मतदान झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com