गुलाम नबी आझादांचा काँग्रेसला मोठा धक्का; तब्बल ६४ नेत्यांचा पक्षाला रामराम

जम्मू-काश्मीरमधील नेत्यांनी गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना पाठिंबा देत राजीनामा दिला आहे
Ghulam Nabi Azad Latest News
Ghulam Nabi Azad Latest NewsSarkarnama

Ghulam Nabi Azad : नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसचा (Congress) राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाला आणखी धक्के देणार आहेत. जम्मू-काश्मीर काँग्रेसमधील (Jammu and Kashmir) अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. अजून अनेक नेते आझाद यांच्या नवीन पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

Ghulam Nabi Azad Latest News
भाजप-मनसे युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

जम्मू-काश्मीरमधील हे नेते राजीनामा देणार आहेत. तारा चंद (माजी उपमुख्यमंत्री), माजिद वाणी (माजी मंत्री), बलवान सिंग (जम्मू-काँग्रेसचे सरचिटणीस), घारू चौधरी, मनोहर लाल शर्मा, गुलाम हैदर मलिक, विनोद शर्मा, विनोद मिश्रा, नरिंदर शर्मा, मसूद, परविंदर सिंग, आराधना अंदोत्रा, संतोष महनस, वरुण मंगोत्रा, संतोष मंजोत्रा, रेहाना अंजुम, रसपौल भारद्वाज, नीरज चौधरी, तीरथ सिंग, सरनाम सिंग, राजदेव सिंग, अशोक भगत, अश्विनी शर्मा, बद्री शर्मा, जगतार सिंग, रासपॉल भारद्वाज, यांच्यासह ६४ जण राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सर्व नेते रविवारी आझाद यांच्या नव्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर 64 नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या आझाद यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या G-23 गटात त्यांचा सहभाग होता.

Ghulam Nabi Azad Latest News
सत्तारांच्या संस्थेतील 12 शिक्षक अडचणीत येणार ; दानवेंचा आरोप

जी-23 गटातील नेते सातत्याने काँग्रेसवर विविध आरोप करत आहे. तसेच काँग्रेसमध्ये अनेक बदलांची मागणी करत आहे. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र, आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. काश्मीरमध्ये नवा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in