गोवा विधानसभेसाठी ५८७ अर्ज दाखल

गोव्याच्या राजकारणात आजही मोठा दबदबा असणा-या प्रतापसिंह राणेंनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अखेरीस न लढण्याचा निर्णय घेतलाय
Goa Assembly Election
Goa Assembly Electionsarkarnama

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. गोव्यात विधानसभेच्या (Goa Assembly Election) ४० जागा आहेत. यासाठी ५८७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशीरा ही माहिती दिली.

उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची आज छानणी होणार आहे. सोमवारी (३१ जानेवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. शुक्रवारी सर्वात जास्त म्हणजे २५४ अर्ज दाखल करण्यात आले.

गोव्याच्या राजकारणात आजही मोठा दबदबा असणा-या प्रतापसिंह राणेंनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अखेरीस न लढण्याचा निर्णय घेतलाय. 1972 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले राणे आता 50 वर्षांनंतर निवडणुकीच्या राजकारणाला रामराम ठोकताहेत.

Goa Assembly Election
'पेगासस'वर मोदी बोलतील का? राऊतांचा सवाल

राणे निवडून येत असणाऱ्या 'पर्ये' मतदारसंघातून भाजपानं त्यांची सून दिव्या राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभारी असणाऱ्या भाजपानं गेल्या काही काळात राणेंना आपल्या बाजूला ओढण्याचाही प्रयत्न केला होता. पण राणेंकडून कोणतही स्पष्ट विधान आलं नाही.

कॉंग्रेसच्या गोव्याच्या पहिल्याच यादीत प्रतापसिंहांचं नाव होतं आणि तीन दिवसांपूर्वी नेहमी ते प्रचार सुरू करण्याअगोदर देवळात नारळ ठेवतात, तसा त्यांनी यंदाही ठेवला. त्यामुळे पोर्येमध्ये गोव्यातला कौटुंबिक राजकीय मुकाबला राणे विरुद्ध राणे, म्हणजे सासरे विरुद्ध सून होणार असं चित्र तयार झालं.

Goa Assembly Election
'आयटम आहे का' असे म्हणणाऱ्या शिवसैनिकाला महिलेकडून चोप ; व्हिडिओ व्हायरल

प्रतापसिंह राणेंची सून देविया राणे यांच्याशी थेट लढत टाळण्यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. देविया राणे पोरियममधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. 87 वर्षाचे प्रतापसिंह राणा हे गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ते पोरियममधून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Goa Assembly Election
राज्यात लवकरत ७२०० पोलिसांची भरती : वळसे-पाटील

शिवसेना यावेळी उत्तर प्रदेश आणि गोवा (Goa) या राज्यांमध्ये निवडणूक लढवत आहे. दरम्यान या निवडणूका शिवसेना आता पहिल्यांदाच राज्याच्या बाहेर स्वतःच्या 'धनुष्य-बाण' या चिन्हावर लढवू शकणार आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला त्यांचे महाराष्ट्रातील पारंपारिक धनुष्य-बाण हे चिन्ह मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com