Cabinet Expansion : मंत्रिपदासाठी ५० आमदारांचे दिल्लीत लॉबिंग; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निष्ठावंतांसाठी जोरदार आग्रह

मंत्रिमंडळ विस्तार करताना हायकमांडने आठ सूत्रे राबवून मंत्रिपद दिले जात आहे.
Karnataka Cabinet Expansion
Karnataka Cabinet ExpansionSarkarnama

Karnataka Cabinet Expansion : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करीत आहेत. मंत्रिपदासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरू असून काँग्रेसचे ५० हून अधिक आमदार दिल्लीत तळ ठोकून आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार हे आपापल्या समर्थक आमदारांना मंत्री करण्यासाठी कामाला लागले आहेत. (50 Congress MLAs from Karnataka lobbing in Delhi for ministerial posts)

कर्नाटकच्या (Karnataka) मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ३४ आमदारांना मंत्री होता येऊ शकते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत दहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. उर्वरीत २४ मंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये (Congress) जोरदार लॉबिंग सुरू आहे. मलाईदार खाती मिळण्यासाठी प्रत्येक आमदार आपल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहे.

Karnataka Cabinet Expansion
Dispute in Congress : नाना पटोलेंविरोधात असंतोष वाढला;काँग्रेसचे बडे नेते भेटले हायकमांडला

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि खात्यांच्या वाटपावर दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी दोन तास चर्चा केली. सिद्धरामय्या हे आपल्या १९ समर्थक आमदारांची यादी घेऊन काँग्रेस हायकमांडला भेटले आहेत, तर उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनीही १६ जणांची स्वतंत्र यादी बनवली आहे. याशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हेही कर्नाटकचे असल्याने त्यांनीही पाच जणांना संधी मिळावी, अशी अट पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली आहे.

Karnataka Cabinet Expansion
Paranda Bazar Samiti : महाविकास आघाडीच्या संचालकांच्या अपहरण प्रकरणात अजित पवारांनी लक्ष घातले; संचालक पुन्हा अज्ञातस्थळी

दरम्यान, मंत्र्यांच्या २४ जागांपैकी पहिल्या टप्प्यात २० मंत्रिपदे भरण्यात येणार आहेत. चार मंत्रीपदे रिक्त ठेवण्याची शक्यता आहे, त्यामुळे वीस मंत्रीपदामध्ये सिद्धरामय्या समर्थक किती, तर शिवकुमार यांच्या जवळच्या किती आमदारांना मंत्रीपदे मिळतात, याकडे कर्नाटकचे लक्ष लागले आहे. काँग्रेस हायकमांडनेही मंत्रिमंडळात जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते, त्यामुळे ज्येष्ठांची पुन्हा पंचाईत होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तार करताना काँग्रेस हायकमांडने आठ सूत्रे राबवून मंत्रिपद दिले जात आहे. लोकसभा निवडणूक समोर ठेऊन मंत्र्यांची यादी अंतिम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्येष्ठ आमदारांना डावलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील विधानसभा निवडणूक लढवली नाही, तरी काँग्रेसचे मोठे नुकसान होणार नाही. त्यासाठी हायकमांडने ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद न देण्याचा निर्णरु घेतला आहे.

Karnataka Cabinet Expansion
Solapur News : ...अन्‌ देवेंद्र फडणवीस ओरडले, ‘ये...पाणी आणा रे कुणीतरी....’

दरम्यान, दिल्लीत सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही मंत्रिमंडळात आपल्या निष्ठावंतांची नावे पुढे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी खात्यांच्या वाटपात विलंब होत आहे. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३४ मंत्री असू शकतात. आमदार लक्ष्मण सवदी, कृष्णा बैरेगौडा, दिनेश गुंडूराव आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांची भेट घेतली.

Karnataka Cabinet Expansion
Daund Bazar Samiti: राहुल कुलांनी उलथवली राष्ट्रवादी सत्ता ; दौंड बाजार समितीवर प्रथमच भाजपचे वर्चस्व

हे आहेत मंत्रीपदाचे संभाव्य दावेदार

ईश्वर खांड्रे, लक्ष्मी हेब्बाळकर, शिवानंद पाटील-दर्शनपूर, बसवराज रायरेड्डी, डॉ. महादेवप्पा, पेरियापट्टण व्यंकटेश, एस. एस. मल्लिकार्जुन, बैराती सुरेश, कृष्णा बैरेगौडा, रहिम खान, अजय सिंग, पुट्टरंग शेट्टी, नरेंद्र स्वामी, चिंतामणी सुधाकर, हिरीयुर सुधाकर, एच. के. पाटील, चेलुवरायस्वामी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com